आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannad Agriculture Pattern Profitable For Farmers

अद्रक लागवडीचा "कन्नड पॅटर्न' ठरतोय शेतकऱ्यांना फलदायी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- तालुक्यात मागील दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक शेतकरी अद्रकाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्याच्या या अनोख्या उत्पादन घेण्याच्या पद्धतीमुळे शेतकरी कर्म खर्चात लाखो रुपयांचे उत्पादन घेताना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कन्नड तालुका अद्रकाचे पीक घेण्यास अग्रेसर असल्याने त्यास "कन्नड पॅटर्न' म्हणून ओळखले जात आहे. विशेषत: हा "कन्नड पॅटर्न ' तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांनाही फलदायी ठरणारा असल्याने अनेक शेतकरी आता आपला मोर्चा त्या पॅटर्ननुसारच अद्रक लागवडीकडे वळताना पाहावयास मिळत आहे.

कन्नड तालुक्यातील अद्रकाला राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षापासून दुष्काळी परिस्थिती, मध्यंतरीच झालेली गारपीट व अधूनमधून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे अद्रकाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती जेमतेम आले. परंतु त्यातच शेतमालाचेही भाव घसरले. तरीही कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तेच ते पीक न घेता शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी कन्नड तालुक्यातील बहिरगाव, अंधानेर, माळीवाडा परिसरात अनेक शेतकऱ्यांनी प्रामुख्याने अद्रकाचे आधुनिक पद्धतीने २०००-२००२ मध्ये उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

एकरी तीनशे क्विंटल घेताहेत शेतकरी अद्रकाचे उत्पादन
एकरी शंभर क्विंटल उत्पादनावरून तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ३०० ते ३५० क्विंटल उत्पादनापर्यंत मजल मारत अद्रक उत्पादनाचे मागील सर्व उच्चांक मोडत कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती आणली. प्रतिक्विंटल कमाल १२ हजार रुपयांचा बाजारभाव मिळून अनेक शेतकऱ्यांना एकेकाळी ३० ते ४० लाखांचा नफा मिळाला. यानंतर बहिरगाव, अंधानेर, माळीवाडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या हातोटीतून समोर आलेल्या कन्नड पॅटर्नचे अवलोकन करत तालुक्यासह देशभरातील शेतकरी उत्पादन घेण्यास प्रेरित झाले आणि बघता बघता कन्नड तालुका अद्रक पिकाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे अद्रक उत्पादनाविषयी आणि खरेदी-विक्रीविषयी माहिती घेण्यासाठी शेतकरी कन्नड तालुक्यात येऊन "कन्नड पॅटर्न' समजून घेत आहेत. तसेच आपले शेतातून उत्पन्न कशा पद्धतीने जास्त घेता येईल, असा विचार करताना दिसून येत आहे.

आठवड्याला १० हजार क्विंटल अद्रक खरेदी
आठवड्यात दहा हजार क्विंटल अद्रक खरेदी-विक्रीचा व्यवहार तालुक्यात उत्पादित होणाऱ्या अद्रकाच्या खरेदी-विक्रीसाठी कन्नड बाजार समितीनेही पुढाकार घेत आठवड्याच्या दर सोमवारी, गुरुवारी अद्रकाची खरेदी-विक्री सुरू केली. या बाजार समितीत दर आठवड्यात सुमारे दहा हजार िक्वंटल अद्रक खरेदी-विक्रीचा व्यवहार होऊ लागला आहे. खरेदी-विक्री करणारी ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली आहे.

कन्नड बनले अद्रक खरेदी-विक्रीचे केंद्र
कन्नडच्या अद्रकीला खरेदीसाठी कन्नडमध्ये येत आहेत. कन्नड येथील अद्रक सुरत, अहमदाबाद, दिल्ली, इंदूर, भोपाळ, कोलकाता येथे विक्रीसाठी जात आहे. तसेच अद्रकचे बेणे नेण्यासाठी शेतकरी, व्यापारी शेतकऱ्याच्या संपर्कात राहू लागले आहेत.

तीन हजार हेक्टरवर आद्रकीची लागवड
तालुक्यात सुमारे तीन हजार हेक्टर अद्रक लागवड होतेे. तीन हजार हेक्टर अर्थात ७५०० एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या अद्रक पिकातून एकरी १०० िक्वंटल अद्रक उत्पादन धरल्यास सात लाख ५० हजार िक्वंटल अद्रकाचे उत्पादन होते.

असा लागतो अद्रक लागवडीसाठी खर्च
अद्रक बेणे (१० िक्वंटल) ४० हजार रुपये, मशागत ५ हजार २०० रुपये, रासायनिक व शेणखतासाठी १२ हजार रुपये. तसेच लागवडीसाठी ४ हजार रुपये, ठिबक सिंचनासाठी ४० हजार रुपये, खुरपणीसाठी ६ हजार, औषण फवारणी ८ हजार रुपये, माती लावणे ४ हजार, अंतर्गत मशागत ४ हजार, किरकोळ खर्च ४ हजार अद्रक लागवडीवर पहिल्या वर्षात सुमारे १ लाख ४८ हजार २०० रुपये खर्च होतो.

एकरी मिळते साडेतीन लाखांचे उत्पन्न
अद्रकाचे उत्पादन एकरी सुमारे १०० ते ३०० िक्वंटलपर्यंत होऊ शकते. सरासरी उत्पादन १०० िक्वंटल धरल्यास सध्या सुंठ असलेला बाजारभाव ३५०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे एकरी तीन लाख ५० हजार रुपये भाव मिळत आहे.

शेतकऱ्यांशी संवाद
कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाचे अध्यक्ष मानसिंह पवार, प्राचार्य डॉ. विनय भोसलेंसह संचालक मंडळाने शेतकऱ्यांसाठी दर शनिवारी कृषितज्ज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी कृतियुक्त सहभाग असतो. त्यामुळे संवादाचा फायदा तालुक्याच्या शेतकऱ्यांना होत आहे.