आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannad AshramShala 12th Mass Copy News In Marathi

संस्थाचालकाच्या घरी पेपर सोडविणार्‍या तेलवाडीच्या केंद्रावरील निकाल राखून ठेवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तेलवाडी (ता. कन्नड) येथील कै. वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या संस्थाचालकाच्या घरी इंग्रजी विषयाची कॉपी सामूहिकरीत्या लिहिण्याचा प्रकार उघड झाला आहे. पेपरमधील सहाव्या आणि सातव्या प्रश्नाची उत्तरे असलेल्या 55 झेरॉक्स प्रती गदाना (ता. खुलताबाद) येथील केंद्रावरही आढळून आल्या. या प्रकाराची शिक्षणाधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात येणार असून तेलवाडीच्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात येतील, असे बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी सांगितले. इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील ‘ऐतिहासिक पर्यटनस्थळाची माहिती व भेट’ व प्रश्न क्र. सातवा ‘भाषण लिहा’ या प्रश्नांची उत्तरे असलेल्या 55 झेरॉक्स प्रती गदाना केंद्राबाहेर आढळून आल्या. या कॉप्या तेलवाडी केंद्रावरूनच आल्याचा संशय बोर्डाचे अध्यक्ष डेरे यांनी व्यक्त केला. गदाना केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारी 1 वाजता जेव्हा ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींचे वाहन केंद्राबाहेर पोहोचले तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भरारी पथक आल्याचे समजून कॉप्या लपवल्या. केंद्राबाहेर आणि आत विद्यार्थी, शिक्षक उभे होते. दोघांनी झुडपात कॉप्या लपवून ठेवल्या. त्याचा शोध घेतला असता 55 झेरॉक्स सापडल्या. केंद्राच्या शेजारील एका रिकाम्या खोलीतून कॉप्या देवाणघेवाणीचे काम सुरू होते. गदाना केंद्रावर झेरॉक्स प्रती सापडल्याप्रकरणाची शिक्षणाधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर येथील 205 विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येणार आहे.
392 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवणार
तेलवाडी येथील आश्रमशाळेत परीक्षार्थी असलेल्या 265 मुले, 127 मुली अशा एकूण 392 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच निकालावर विचार करण्यात येईल.

पुढील स्लाइडमध्ये, फौजदारी खटले दाखल करणार