आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुदरत : एका एकरात गव्हाचे 41 क्विंटल उत्पादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड (जि. औरंगाबाद) - गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रब्बीचा हंगाम हातचा गेला असताना हसनखेडा येथे प्रयोगशील शेतकरी बबनराव रायभान दळवी यांनी एका एकरात 41 क्विंटल गव्हाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यातून त्यांनी खर्च वजा जाता 86,700 रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
कुदरत या गव्हाच्या वाणाच्या 20 किलो बियाण्याची त्यांनी पेरणी केली होती. मका पीक निघाल्यावर शेत नांगरून वखराच्या दोन पाळ्या देत सर्‍या पाडल्या. पिकाला 18: 46 दोन बॅग व पोटॅश एक बॅग दिले. महिन्यानंतर युरियाची दीड बॅग टाकत पहिली कोळपणी केली. त्यानंतर 15 दिवसांनी 18:46 एक बॅग व युरिया अर्धा बॅग खत टाकत दुसरी कोळपणी करत उभारणी केली. एकेरी पेरणी असल्याने आंतरमशागत सुलभ असून, त्यास भरपूर फुटवा फुटतो. वादळवार्‍यात हा वाण पडत नाही. गव्हाची उंची 4 ते 4.5 फूट होती. ओंबीची लांबी 8 ते 10 इंच होती. एका ओंबीमध्ये 120 ते 130 दाणे होते.
86, 700 रुपयांचा निव्वळ नफा
खर्च असा
नांगरट : 1100 रु.
रोटोव्हेट : 1000 रु.
बियाणे : 2400 रु.
खत, पेरणी : 1200 रु.
खत 3 बॅग : 3600रु.
युरिया 2 बॅग: 600 रु.
पोटॅश 1 बॅग :1000रु.
कोळपणी : 1500 रु.
पाणी भरणे : 1400 रु.
काढणी : 2000 रु.
एकूण खर्च : 15, 800 रु.
उत्पन्न असे
एकरी उत्पादन : 41 क्विं.
सरासरी भाव :
2500 रु. क्विंटल
एकूण खर्च : 15,800 रु.
खर्च वजा जाता नफा :
86, 700 रुपये