आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannad MLA Harshvardhan Jadhav On Strike At Aurangabad

कन्नडचे आमदार जाधव यांचे बेमुदत उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या कामांतील अनियमितता, कामे न करताच बिले उचलण्याचा प्रकार आणि खोटी देयके सादर करून पैसे उचलण्याचे प्रकरण दाबून टाकले जात असल्याचे प्रकरण अशा अनेक बाबींसंदर्भात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.

आमदार जाधव म्हणाले की, कन्नड-पिशोर रस्त्यावरील 13 व्या वित्त आयोगातून होत असलेले निकृष्ट काम बंद करावे, या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता तपासली जावी, कन्नड-चिकलठाण रस्त्याचे काम खुल्या निविदेनुसार देण्यात यावे, ज्या कंपनीला बेकायदा कंत्राट देण्यात आले आहे त्या कंपनीवर मेहेरबानी करणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करावे, कन्नड-चिकलठाण रस्त्याचे 25 टक्के कामही झाले नसताना कंत्राटदाराला 75 लाख रुपयांचे देयक देणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करावे आदी प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असेही ते म्हणाले. बुधवारपासून सुरू झालेल्या या उपोषणात आमदार जाधव यांच्यासोबत जि. प. सदस्य संगीता चव्हाण, शेकनाथ चव्हाण, दत्तू चव्हाण, परसराम बोळकर, सोनाजी गाडेकर, अण्णासाहेब चव्हाण आदी सहभागी झाले आहेत.