आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannad Police House Breaker Balya Thief Taken Film Stylus

कुख्यात घरफोड्या बल्या फिल्मी स्टाइलने पकडला, कन्नड पोलिसांचे यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - शहर परिसरात घरफोड्या करणारा कुख्यात बल्या ऊर्फ महेंद्र सजन शिंदे यास जेरबंद करण्यात कन्नड पोलिसांना रविवारी पहाटे यश आले.

शहरातील दत्त कॉलनी येथील दिलीप कैलास गायकवाड याच्या घरातून दोन मोबाइल, रोख ५९०० रुपये घेऊन पोबारा केला होता. कन्नडचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोहेकाॅ कैलास निंभोरकर, चालक गजानन कऱ्हाळे, किरण गंडे, केसरसिंग राजपूत, रवींद्र ठाकूर, प्रवीण बर्डे, बालाजी कोणगीरवार, पोलिस मित्र गणेश टोंपे आदींनी रात्री दीड ते पहाटे पाचपर्यंत फिल्मी स्टाइलने पाठलाग करून घरफोड्या बल्या ऊर्फ महेंद्र सजन शिंदे (२१, रा. साठेनगर, ता . कन्नड) यास पकडले. या गस्तीवरील पथकाने बल्यास रात्री जिल्हा परिषद हायस्कूलच्या कंपाउंडवरून उडी मारून पळून जाताना पाहिले. तेथून पोलिसांनी त्याचा िफल्मी स्टाइलने पाठलाग सुरू केला.

बल्या साठेनगरातून गल्ली बोळातून या घराहून त्या घरावरून उड्या मारत गुंगारा देत होता. मात्र, पावणेपाचच्या सुमारास बल्यास अखेर पकडले. हा थरार सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी पाहिला. बल्याकडून गायकवाड यांच्या घरातून चोरलेले दोन मोबाइल, रोख ५९०० रुपये जप्त केले.