आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडचा राहुल खरे गौरव महाराष्ट्रच्या अंतिम आठमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - भोकनगाव येथील राहुल खरे या विद्यार्थ्याने ई टीव्ही मराठीवरील "गौरव महाराष्ट्राचा' या गायन स्पर्धेत अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला आहे. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला राहुल खरे याला लहानपणापासूनच त्याला गायनाची आवड आहे. शाळा, महाविद्यालयात या कलेला वाव मिळाल्याने त्याची कला अधिकच फुलत गेली. या कार्यक्रमासाठी त्याने सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे ऑडिशन दिली. ग्रामीण भागातील असूनही राहुलने मोठ्या आत्मविश्वासाने आतापर्यंत चौदा जोड्यांपैकी अंतिम आठ जोड्यांमध्ये प्रवेश मिळवला आहे. आतापर्यंत त्याच्या एकाही गाण्यास लाल लाइटचा संकेत मिळालेला नाही.
प्रतिक्रिया कळवा
सोमवार व मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमाचे सध्या मुंबईच्या चेंबूर येथील आर.के.स्टुडिओत शूटिंग सुरू असून सोमवार व मंगळवारी रात्री ९.३० ते १०.३० दरम्यान हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ई टीव्हीने ०२२४०-४१४३४३ या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया कळवण्याचे आवाहन केले आहे.
फोटो - ई टीव्हीच्या गौरव महाराष्ट्रात दर्जेदार गायकी सादर करताना कन्नड तालुक्यातील राहुल खरे.