आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाडजवळ ट्रकला आग, 17 लाखांचा माल खाक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड - विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने चिंध्यांनी भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील गाढेजळगाव शिवारात बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र
ट्रकमधील 17 लाखांचा माल जळून खाक झाला.
गाढेजळगाव शिवारात निसारबेग मिर्झा यांचा गादीचा कारखाना व कपड्याच्या चिंध्या विक्रीचा व्यवसाय आहे. हा कारखाना जालना महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. नेहमीप्रमाणे कारखान्यातून एक ट्रक चिंध्या भरलेल्या गाठी घेऊन बाहेर निघाला होता. त्या वेळी कारखान्याच्या बाहेर रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजतारांना स्पर्श झाल्याने आगीची ठिणगी उडून हा अपघात झाल्याचे करमाड पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. सादिक वाहेद हारून सिद्दिकी (रा. भिलाई) हा चिंध्याने भरलेला ट्रक (सीजेई-4724) छत्तीसगडकडे घेऊन जाण्यासाठी निघाला होता. परंतु वीजतारेला स्पर्श होताच तो आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. कपड्याच्या चिंध्या असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. गावकºयांनी घटनेची माहिती करमाड पोलिस ठाण्यात दिली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन पथकास पाचारण करून आग आटोक्यात आणली.