औरंगाबाद - नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उत्सवाचा आज शेवटचा दिवस. या उत्सवादरम्यान औरंगाबाद येथे ९ दिवसांची कर्णपूर्याची जत्रा भरते. येथे असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या आवारात ही जत्रा भरत असून औरंगाबादमध्ये भरणारी ही सर्वात मोठी जत्रा असते. येथे अनेकविध खेळण्यांचे प्रकार, रातपाळणे, विविध वस्तूंचे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लागतात. त्यामुळे येथील रात्रही दिवसाप्रमाणे होऊन जाते. लाखोच्या संख्येने भावीक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. तसेच या जत्रेचाही अस्वाद घेतात. प्रत्येकजण
आपापल्या आवडी-निवडीच्या गोष्टी, खेळ, वस्तू, खाद्यपदार्थ येथे शोधत असतो. तर काही जण हे सर्व क्षण आपल्या कॅमेर्यात टिपण्यासाठी धडपड करत असतात. आज Divyamarathi.com खास तुमच्यासाठी घेऊन आलाय. या जत्रेची काही खास क्षणचित्रे...