आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या विद्यार्थिनीचे विद्यापीठातील जलस्रोतांवर संशोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाणी पातळी वाढवण्यासाठी जलयुक्त विद्यापीठ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असली तरी त्यापूर्वी जलस्राेतांचे शुद्धीकरण करण्यासाठी विद्यापीठाला कंबर कसावी लागणार आहे. पर्यावरणशास्त्र विभागातील काश्मिरी विद्यार्थिनी सकिना बानो मोहंमद हुसैन यांनी केलेल्या संशोधनानुसार येथील भूगर्भ आणि भूजल साठे क्षमतेपलीकडे दूषित झाले आहेत. हे पाणी पिण्यासाठी तर दूर, वापरण्यासही उपयुक्त नाहीत. मात्र, ते शुद्ध केले, गाळ काढला तर परिसरातील नागरिकांची तहान भागू शकेल, असा निष्कर्षही त्यांनी दिला आहे.शहराला तीव्र पाणीटंचाई सतावत आहे. विद्यापीठातही पाण्याची समस्या आहे. वसतिगृहांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. या परिस्थितीवर मात करणे सहज शक्य आहे. पाण्याच्या बाबतीत विद्यापीठ स्वयंपूर्ण होऊ शकते. विद्यापीठात ५२ विहिरी आणि १८ बंधारे आहेत. अनेकांत पाणी उपलब्ध आहे. मात्र, विहिरींतील पाण्याचा उपसा होत नसल्याने त्यात गाळ साचला आहे, तर बंधाऱ्यांत परिसरातील वस्त्यांचे सांडपाणी येत असल्याने ते दूषित झाले असल्याचे पर्यावरणशास्त्र विभागातील एमएस्सीची काश्मिरी संशोधक विद्यार्थिनी सकिना बानो मोहंमद हुसैन यांच्या "फिजिओकेमिकल पॅरामीटर्स ऑफ वॉटर क्वालिटी ऑफ सोर्सेस प्रेझेंट इन दि युनिव्हर्सिटी प्रिमायसेस' या संशोधनात म्हटले अाहे. यासाठी त्यांना विभागप्रमुख प्रा.डाॅ.एन.एन.बंदेला, प्रा.डाॅ.महादेव मुळे, प्रा.डाॅ. सतीश पाटील, प्रा.डाॅ. बलभीम चव्हाण आणि प्रा. वाय.एल.पद्मे यांचे मार्गदर्शन मिळाले.
पाण्यातील१७ घटक तपासले : सकिनायांनी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठातील विहिरी, हातपंप, बोअर, तळे आणि बंधाऱ्यांतील पाण्याचे नमुने गोळा केले. या पाण्यातील पीएच, डीओ, बीओडी, सीओडी, हार्डनेस, टर्बिडिटी, अल्कॉलिनिटी, नायट्रेट, फॉस्फेट, क्लोराइड आदी तब्बल १७ घटक तपासले. जागतिक आरोग्य संघटना आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड््सच्या निकषांवर सर्वच घटक प्रमाणाबाहेर असल्याचे सिद्ध झाले.
ही आहेत निरीक्षणे
>तीन बंधाऱ्यांतील पाणी प्रमाणाबाहेर दूषित आहे. या ठिकाणी सर्रास कचरा, खरकटे टाकले जाते. बंधाऱ्यांत गणपतीच्या भंगलेल्या मूर्ती दिसून अाल्या. प्लास्टर ऑफ पॅरिस, रंगामुळेही पाणी दूषित झाले.
>सोनेरीमहालासमोरील एका तळ्यातील तसेच डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्यात लगतच्या वस्तीतील सांडपाणी सोडले जाते.
>जवळपासबोअरचे पाणीही पिण्यास योग्य नाही. हार्डनेस आणि अल्कॉलिनिटी जास्त आहे.
>महादेवमंदिराजवळील विहिरीतील पाण्यात कॅल्शियम कार्बाेनेट आणि मॅग्नेशियमचे प्रमाण किती तरी पट अधिक आहे. यामुळे पाण्याचा हार्डनेस वाढला अाहे.
>हे पाणी प्यायल्यामुळे किडनी स्टोन, पोटाचे विकार, नेत्ररोग, मूत्रपिंडाचे रोग, कावीळ, खोकला आदींचा धोका संभवतो, तर भूजलाच्या पाण्यामुळे त्वचेचे विकार होण्याचा धोका आहे. प्राण्यांसाठीही हे पाणी घातक आहे.
सूचना
>विहिरींतील गाळ काढून त्या स्वछ कराव्यात. त्यांच्यावर जाळी बसवावी.
>तलाव,बंधाऱ्यांत गणेश विसर्जन बंद करावे. या बंधाऱ्यांचे कठडे तुटले आहेत. ते दुरुस्त करावेत.
>भूगर्भातीलजलसाठे पूर्ववत करण्यासाठी विशेष उपाययोजना करावी.
>विहिरी,तलाव, बंधाऱ्यांत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी. तसा इशारा देणाऱ्या पाट्या लावाव्यात.
टंचाईचा प्रश्न सुटेल
विद्यापीठातीलवसतिगृहांतखासगी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावरील उपाययोजना आपल्याच हातात आहेत. विद्यापीठात पाणी आहे, पण ते दूषित झाले आहे. ते शुद्ध करून वापरले तर पाणीटंचाईचा प्रश्न सहज सुटेल. लोकांनीही या ठिकाणी कचरा टाकणे, सांडपाणी साेडणे बंद करायला हवे. - सकिना बानो मोहंमद हुसैन, संशोधक विद्यार्थिनी
बातम्या आणखी आहेत...