आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kedarnath Temple Aurangabad Pilgrims Stil Missing Due To Flood

केदारनाथमध्ये पर्यटक अडकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्थानिक जेथलिया कुटुंबासमवेत केदारनाथ यात्रेवर गेलेल्या 19 पैकी तिघांशी संपर्क झाला असून सोळा जणांशी संपर्क होत नसल्याने शहरातील जेथलिया कुटुंबीय व त्यांच्या नातेवाइकांची घालमेल सुरू आहे. केदारनाथहून परतीच्या प्रवासाला 16 जून रोजी निघालेल्या भाविकांची गौरीकुंड येथे मोठय़ा प्रमाणावर अचानक आलेल्या पावसाने ताटातूट केली.

केदारनाथच्या दश्रनासाठी 9 जून रोजी औरंगाबादहून रवाना झालेल्या जेथलिया कुटुंबीयांसमवेत जालना व हिंगोली येथील नातेवाइकांचा समावेश होता. रुद्रप्रयाग येथून 18 सदस्यांनी 15 जूनला केदारनाथची यात्रा पूर्ण करून 16 जूनला परतीचा प्रवास सुरू केला. प्रवासात दिनेश जेथलिया (55), दुर्गा जेथलिया (51), नरेश जेथलिया (32), खुशबू जेथलिया (28), भगीरथ जेथलिया (57), सुनीता जेथलिया (48), विनायक म्हसलेकर (32), पुरुषोत्तम तोष्णीवाल (38), सुरेखा तोष्णीवाल (32), प्रथमेश तोष्णीवाल, नारायण काबरा (45), मीनाक्षी काबरा (42), निकिता काबरा व मोहित काबरा यांचा समावेश होता. शहरातील विजयकुमार जेथलिया अपंग असल्याने गौरीकुंड येथे थांबले होते. त्यांना सैन्य दलाच्या पथकाने डेहराडून येथे आणले. डेहराडूनच्या जॉली जॉन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून सुटी देण्यात आली. औरंगाबादहून गेलेल्या त्यांच्या नातेवाइकांसोबत ते डेहराडूनला लॉजमध्ये थांबले आहेत. विजयकुमार यांच्या पत्नी सुनीता या रामबाडा येथे अडकल्या असून त्यांचा मोबाइलवर संपर्क झाला आहे. विजयकुमार यांचा मुलगा सुजय गौरीकुंड येथे पावसात अडकला होता. तो सुरक्षित असल्याचा संदेश जेथलिया कुटुंबातील औरंगाबाद येथील सदस्यांना मिळाला.

अशी झाली ताटातूट : विजयकुमार जेथलिया वगळता सर्वजण 16 जूनला परतीच्या प्रवासासाठी घोडे व पालख्यांमधून निघाले होते. गौरीकुंडजवळ येताच सकाळी 10.30 वाजता अचानक पाऊस आल्याने सर्वांची ताटातूट झाली. रॉयल ट्रॅव्हल्सचा टूर गाइड त्यांच्यासोबत होता. त्याच्या मतानुसार गौरीकुंडपूर्वी 2 किमी अंतरावर असतानाच एकदम पाऊस आल्याची घटना घडली. सर्वजण रामबाडा येथे असावेत असा अंदाज लावला जात आहे.