आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सह्यांच्या रूपात जपला वडिलांच्या आठवणींचा ठेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( पहिला फोटो अजय मानवतकर आणि दुसरा फोटो शिवाजी महाराजांची सनद )
औरंगाबाद- छंदच माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतो. प्रत्येक जण आपापल्या परीने छंद जोपासत असताे. आरोग्य विभागात काम करणारे दिगंबरराव भगवानराव मानवतकर यांना विविध क्षेत्रांतील नावाजलेल्या व्यक्तींच्या सह्या जमवण्याचा आगळाच छंद जडला होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी हा छंद जोपासला. त्यांच्या आठवणींचा ठेवा जोपासत त्यांचे चिरंजीव अजय मानवतकर यांनी हा छंदरूपी वारसा पुढे नेला आहे.
वडिलांनी जमवलेल्या सह्यांची वही आजही अजय जिवापाड जपतात. विशेष म्हणजे अजय यांनी या वहीत अमिताभ बच्चन, श्रीधर फडके, हरिप्रसाद चौरसिया अशा नामवंत व्यक्तींच्या सह्यांची भर घातली आहे. दिगंबरराव हे आरोग्य विभागात रजिस्ट्रार म्हणून कार्यरत होते. ड्यूटीवर असताना १९९० मध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन करून त्यातील महत्त्वाची कात्रणे काढणे, विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना भेटून त्यांच्या सह्या मिळवण्याचा छंद त्यांनी शेवटपर्यंत जोपासला.
या आवडीपोटी त्यांनी प्रख्यात साहित्यिक, नाटककार पु. ल. देशपांडे, शरद तळवलकर, आचार्य अत्रे, मंगेश पाडगावकर, कवी वसंत बापट या व्यक्तींच्या सह्या घेतल्या. यात लोकमान्य टिळकांच्या कुटुंबाचे वृत्तपत्रात प्रकाशित झालेले छायाचित्र, लेखक, नाटककारांच्या छायाचित्रांचे कात्रण त्यांनी वहीत जपले आहे. अमिताभची सही घेण्याची त्यांची इच्छा होती. ती अजय यांनी प्रोझोनचे संचालक अनिल इरावणे त्यांच्या पत्नी ज्योती यांच्या साहाय्याने मिळवली.
शिवाजी महाराजांची सनद
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली सनद वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. त्याचे कात्रण दिगंबररावांनी वहीत जतन करून ठेवले. कवी कुसुमाग्रजांचा संदेश, बालगंधर्व, प्रल्हाद केशव अत्रे यांचे हस्ताक्षर यात आहे. याशिवाय पाककृतींवरील निवडक लेखांचा संग्रह त्यांनी केला होता. वडिलांचा छंद आपणही जोपासत असून यातून प्रचंड आनंद मिळत असल्याचे अजय यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...