आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ. मुं. शिंदे यांना केळकर पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणारा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार या वर्षी प्रसिद्ध कवी व साहित्यिक फ. मुं. शिंदे यांना जाहीर झाला. मानपत्र, शाल-र्शीफळ व रोख पाच हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दहा ऑक्टोबर रोजी पुणे येथे सायंकाळी साडेसहा वाजता वाचनालयाच्या केशव सभागृहात आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते शिंदे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. यापूर्वी शिवाजीराव भोसले, गो. नि. दांडेकर, शंकरराव खरात, वसंत कानेटकर, शांता शेळके, द. मा. मिरासदार आदी साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.