आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार अतुल सावेंना सर्वांसमक्ष केणेकर समर्थकांची धक्काबुक्की

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कार्यकर्त्याचा धक्का लागण्यावरून भाजपचे आमदार अतुल सावे आणि महापालिकेतील गटनेते संजय केणेकर यांच्यात बुधवारी (एक एप्रिल) जोरदार वादावादी झाली. केणेकर समर्थकांनी सावेंना धक्काबुक्कीही केली. स्थानिक पदाधिका-यांनी हस्तक्षेप करूनही दोघे मागे हटण्यास तयार नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर केणेकर व त्यांचे समर्थक तावातावाने जेवण सोडून बाहेर पडल्यावर तणाव काहीसा निवळला. रात्री उशिरापर्यंत सावे आणि केणेकरांची समजूत घालण्याचे काम सुरू होते. दोघांनाही अहंकाराचा वारा लागल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होती.

काल्डा कॉर्नर येेथील भाजपच्या मुख्य प्रचार कार्यालयात मनपा निवडणूक लढवू इच्छिणा-यांच्या मुलाखतींचा दुसरा टप्पा बुधवारी झाला. प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, सावे, केणेकर, माजी आमदार किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड, बसवराज मंगरुळे, शहराध्यक्ष भगवान घडामोडे आदींच्या निवड समितीने उमेदवारांशी चर्चा आटोपली. त्यानंतर मंडपातच सर्वांच्या जेवणाची सोय केली आहे. त्याचा आस्वाद घेण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली. एकीकडे पदाधिकारी आणि दुस-या बाजूने कार्यकर्ते अशी व्यवस्था जेवणासाठी केलेली होती.

सहज विचारणा केली अन्... : प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या व्यवस्थेकडे जात असताना सावे यांनी केणेकर यांच्या कार्यकर्त्यांना हटकले. काय रे इका वेळ काय करता इथे? अशी सहज विचारणा केली. त्यावरून एका कार्यकर्त्याचा पारा चढला. साहेब, आम्हाला असे का बोलता, असा प्रति सवाल त्याने केला. तेवढ्यात त्याच्यासोबतच इतर जण सावेंजवळ पोहोचले आणि त्यांनी आवाज चढवला. त्यामुळे सावेही संतापले. हा प्रकार कळताच केणेकर तेथे दाखल झाले.
मग त्यांच्यात आणि सावेंमध्ये अरे कारे पर्यंत जोरदार शाब्दीक चकमक झाली. माझ्या कार्यकर्त्याला का बोलला, असे केणेकर म्हणत होते. तर मी आता पूर्वीसारखा साधा पदाधिकारी राहिलो नाही. या शहराचा आमदार झालो आहे. माझ्याशी सन्मानानेच बोलले पाहिजे, असे सावे म्हणत होते. दोघेही हमरीतुमरीवर आल्याने सारे जण अवाक झाले होते. डॉ. कराड, बोराळकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण तो अपयशी ठरला. सावे खूपच आक्रमक झाले होते. ते पाहून केणेकर व त्यांचे समर्थक जेवण न करताच मंडपाबाहेर पडले.

पुढे वाचा... अहंकाराचा वारा