आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khadase Commented About Wakfboard Land Possession

वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेणार - महसूल मंत्री एकनाथ खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रात एक लाख एकरपेक्षा जास्त जमिनी आहेत. मात्र, मराठवाड्यात तसेच राज्यात इतरत्र त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. खरेदी-विक्री, भाडेतत्त्वाचे व्यवहारही झालेत. मात्र, केंद्र सरकार याबाबत नवीन कायदा करत असून तो मंजूर झाल्यास सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरतील आणि या जमिनी ताब्यात घेतल्या जातील, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिली.

‘लोकसभेच्या आगामी अधिवेशनात हा नवा कायदा मंजूर झाला तर वक्फच्या जमिनींचे अातापर्यंतचे सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरतील. त्यानंतर त्या जमिनी वक्फ बोर्डाकडे परत येतील. धार्मिक कार्यासाठी आवश्यकता असेल तरच या जमिनी देण्यात येतील’, असेही खडसे यांनी सांगितले. वक्फच्या

जमिनीवर सरकारी कार्यालये उभारली गेली. अनेकांनी या जमिनी लीजवरही दिल्या आहेत. अनेक प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. प्रकरणे न्यायालयात सुरू असली तरी नवीन कायदा लागू झाल्यानंतर सर्वच वाद आपोआपच संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे सर्व जमिनी वक्फ बोर्डाकडेच येतील, असे खडसे म्हणाले.