आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांच्या घरांसमोर "खड्डे खोदो' आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याबाबत पदाधिकारी, अधिकारी काहीच पावले उचलत नाहीत. पदाधिकारी केवळ रबरी स्टॅम्प असल्याने थेट अधिकाऱ्यांच्या घरासमोर मनसेच्या वतीने खड्डे खोदो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष गौतम अामराव यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पदाधिकारी, अधिकारी, गुत्तेदारांच्या साखळीमुळे रस्त्यांची परवड झाली. गणेशोत्सव, बकरी ईद, गोपाळकाला, नवरात्रोत्सव असे सण खड्ड्यांतच साजरे करायचे का, असा सवाल उपस्थित करून आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, तीन उपायुक्त, शहर अभियंता, तीन कार्यकारी अभियंते यांच्या घरासमोर खड्डे खोदो आंदोलन केले जाईल. या वेळी गजनगौडा पाटील, आशिष सुरडकर, अॅड. दुष्यंत कल्याणकर, संकेत शेटे, आनंद खरात उपस्थित होते.