आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफ रेकॉर्ड नाराजी: खासदार खैरेंच्‍या वाढविसानिमित्‍त दुष्काळातही जेवणावळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा आणि खासकरून औरंगाबाद जिल्हा दुष्काळात होरपळत असताना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाटक, गाणी, नृत्य स्पर्धांची रेलचेल सुरू आहे. शिवाय स्नेहभोजनाच्या नावाखाली जेवणावळीही झडत आहेत. एकीकडे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दुष्काळात हारतुरे नको, असे सांगत सत्कार समारंभ नाकारले, खुद्द उद्धव ठाकरे यांनी आपली छायाचित्रांच्या विक्रीतून येणारी रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला असताना उपनेत्यासारख्या महत्त्वाच्या पदावरील नेत्याने वाढदिवसाच्या सोहळ्याचा असा बार उडवल्याने शिवसेनेतच नाराजीचा सूर उमटत आहे. सलग तिसऱ्या वर्षी मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून भयाण उन्हाळा कसा पार करणार याचे उत्तर ना शासनाकडे, ना प्रशासनाकडे आहे. परिस्थिती खरेच गंभीर असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: आपल्या पक्षाच्या आमदारांना घेऊन मराठवाड्याचा दौरा करून दुष्काळाच्या संकटाबाबत गंभीर भूमिका घेतली. त्यांच्या भावनेनुसारच पक्षातील इतर नेते काम करत आहेत.
ऑफ रेकॉर्ड नाराजी
यासंदर्भात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बहुतेक सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली. यातून चुकीचा संदेश जाणार असल्याने मनपा निवडणुकीच्या काळात असे वागणे चुकीचे असल्याची भावनाही काहींनी बोलून दाखवली; पण ऑन रेकॉर्ड बोलण्यास सर्वांनी नकार दिला. यावरून खैरे यांचा धाक पुन्हा स्पष्ट झाला आहे,