आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खैरेंना पारदर्शकतेचे वावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बंद खोलीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- कन्नडता लुक्यातील रस्त्यांच्या कामासंदर्भात खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहाच्या बंद खोलीत घेतली. 

तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. बऱ्याच वर्षांपासून तालुक्यातील विविध अंतर्गत रस्त्यांसंदर्भात लोकांची ओरड आहे. नवीन रस्ते तयार होणे गरजेचे आहे आणि त्यासंदर्भातील मीटिंग होणे ही बाबदेखील अभिनंदनीय आहे. मात्र नेहमी आपल्या छोटेखानी कार्यक्रमांनाही प्रसिद्धी देणाऱ्या खा.खैरेंनी ही बैठक अत्यंत गुप्त पद्धतीने का घेतली, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. एरवी बांधकाम विभाग वाऱ्यावर सोडून औरंगाबादेतच राहणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक कन्नड येथे घेतली, मात्र बैठकीदरम्यान काय घडले याबाबत ना अधिकारी ना खा.खैरे ना अन्य कार्यकर्ते कुणीही माहिती दिली नाही. खा.खैरेंना पारदर्शकतेचे वावडे आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अत्यंत गुप्तता पाळत ही बैठक झाल्याने रस्त्यासारख्या ज्वलंत प्रश्नाच्या विकास कामांच्या संदर्भात गुप्तता का? विकास कामांची वाच्यता करता विकास करायचा असे तर खा.खैरेंनी ठरवले नाही ना, अशीही चर्चा नागरिकांत दिसून आली. 

यापूर्वी तयार झालेले रस्ते काही दिवसांत, महिन्यांत खराब झाले, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत आणि कार्यालयीन दिनी उपस्थितही नसतात. त्यामुळे खा.खैरेंनी याबाबत काय भूमिका घेतली किंवा घेणार, याबाबत खैरेंनी अधिकाऱ्यांना विचारणा केली का ? की खा.खैरे यांचा वचक राहिला नाही? असे एक ना अनेकविध प्रश्न निर्माण होत आहेत. या बैठकीसही अनेक अधिकारी गैरहजर होते. या बैठकीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विविध रस्त्यांसंदर्भात चर्चा झाली. उशिरा का होईना खा.खैरेंनी विकास कामांच्या संदर्भात अर्थात रस्त्यांच्या संदर्भात बैठक घेतली. मात्र माहिती गुलदस्त्यात ठेवल्याने हे रस्ते होणार की रस्तेही गुलदस्त्यात राहणार, अशी चर्चा शहरात होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...