आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खैरेंना लोकसभा हरण्याची भीती असल्याने भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप, भाजपचा टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपने पैसे वाटले म्हणून ते नंबर वन ठरल्याचा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी केला होता. त्याला भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिले. आम्ही नंबर टू ठरलो याचे सेनेला शल्य आहे. खैरेंच्या मतदारसंघात भाजप खूप पुढे गेल्यामुळे त्यांना आता लोकसभा हरण्याची भीती वाटू लागली आहे. परिणामी मन:स्थिती बिघडल्याने खैरे असे आरोप करत अाहेत, असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी लगावला आहे. 

‘दिव्य मराठी’शी बोलताना जाधव म्हणाले, आम्ही कोठेही पैसे वाटले नाहीत. केंद्र तसेच राज्य शासनाने गोरगरिबांची जी कामे केली त्यातून आम्हाला हे मतदान झाले आहे. भाजपला जिल्ह्यात लाख ६० हजार मते मिळाली. एवढी मते पैसे देऊन विकत घेता येतात का, असा सवालही त्यांनी केला. युतीचा विचार करता जिल्ह्यात शिवसेना कधीही दुसऱ्या क्रमांकावर गेली नाही. भाजपला कायम दुय्यम स्थान राहिले. आता ती वेळ सेनेवर आल्याने त्यांची घालमेल सुरू झाली आहे. 

यापूर्वी जेव्हा सेना पहिल्या क्रमांकावर असायची तेव्हा सेनेने पैसे वाटले असे आम्ही कधी म्हटलो नव्हतो. सेनेपेक्षा काँग्रेसला कमी जागा आहेत. राष्ट्रवादीला तर नाममात्र जागा मिळाल्या, परंतु त्यांनी असे आरोप केले नाहीत. याचा अर्थ सेना अपयशाने खचली आहे. शिवसेनेकडूनच पैशाचे वाटप होत असावे. कारण त्यांच्याच पालकमंत्र्यांनी पैसे पुरवले नाहीत, असा खैरे यांचाच आरोप आहे. त्यामुळे खैरे यांनी भाजपवर काय आरोप केले ते गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...