आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंब यांचा प्रस्ताव माझ्याकडून गेलेला नाही : खासदार खैरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद शिवसेनेकडे उमेदवारांची कमतरता नसून गंगापुरात, तर पाच जण स्पर्धेत आहेत.विवद्यमान अपक्ष आमदार यांच्या प्रवेशाबाबतचा विषय उद्धव ठाकरेंकडे असला तरी माझ्याकडून तो प्रस्ताव गेलेला नाही असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले आहे.
सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यावर आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातसुद्धा इतर पक्षांतील अनेकांनी शिवसेनेत येण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यांना पदे लगेच देता येणार नाहीत. आमच्याकडे पदाधिकारी आणि इच्छुक खूप आहेत. त्यांना कसे डावलता येईल असा सवाल त्यांनी केला.
गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांचाशिवसेना

प्रवेशाचा प्रस्ताव आहे. पण तो माझ्याकडून गेलेला नाही. ते प्रकरण उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. तेच त्यावर निर्णय घेतील. मी त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. पण गंगापुरात आमच्याकडे खूप स्पर्धा आहे. अण्णासाहेब माने, त्यांचा मुलगा संतोष, दिनेश मुथा आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हेही इच्छुक आहेत. आम्हाला चिंता नाही.
कुणी कुठे जाणार नाही
राज्यात महायुतीच जिंकणार असे वातावरण असल्याने शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ वाढल्याचे सांगत खासदार खैरे म्हणाले की, असे असताना आमच्यातून कोण कशाला बाहेर जाईल? काही जण राज ठाकरेंना जाऊन भेटल्याच्या चर्चा येतात. पण त्यांना विचारल्यावर असे काही नाही हे तेच सांगतात. त्यामुळे आमच्यातून कोणी कोठे जाणार नाही असे ते म्हणाले.