आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा-देवळाईत खैरेंची सभा; कदम गट दूरच !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातारा-देवळाईतीलनिवडणुकीवर कदम गटाचे वर्चस्व असल्याने सुरुवातीपासून यापासून दूर असलेले खासदार खैरे यांनी अखेर प्रचारात सहभाग नोंदवला. मंगळवारी खैरे यांनी सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांत कॉर्नर बैठक आणि सभा घेतल्या. परंतु खैरे यांनी प्रचारात सहभाग नोंदवताच प्रचाराची धुरा सांभाळणारे प्रमुख सभेपासून दूरच राहिले. १५ दिवसांपासून दोन वॉर्डांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली.
परंतु प्रचार कार्यालयाचे उद्घाटन वगळता खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रचारापासून फारकत घेतली होती. देवळाई वॉर्डाच्या प्रचाराची जबाबदारी पक्षाने राजेंद्र जंजाळ यांच्याकडे सोपवली. त्यामुळे परिसरात कदम-खैरे गटाचे राजकारण सुरू झाले. यासंदर्भात "दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर खैरे यांनी मंगळवारी दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू करण्यास प्रारंभ केला. बुधवारीही खैरे साताऱ्यात स्वतंत्र सभा घेणार आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या प्रचारात मात्र देवळाईच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. कदम-खैरे गटाच्या राजकारणामुळे गुरुवारी होणाऱ्या पालकमंत्री रामदास कदम यांच्या होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रचारादरम्यान खैरे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शहरातच गाशा गुंडाळणाच्या तयारीत असणाऱ्या समांतर पाणी योजनेचे पाणी देण्याचे आश्वासन सातारा-देवळाईकरांना दिले.