औरंगाबाद- धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंद सिंहजी यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली होती. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्थापित केली. शिख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली, हा प्रामाणिक उद्देश त्यामागे होता.
गुरूजींनी 7 ऑक्टोबर 1708 मध्ये नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला. गुरूजींनी स्थापन केलेल्या खालसा पंथाचे स्वरूप लढाऊ होते. त्यावेळी समाजबांधवांना शिस्तीच्या एका धाग्यात बांधण्यासाठी त्यांनी पाच 'क'कारांची निर्मिती त्यांनी केली. 'क'कारांचे आचरण करणार्यास खालसा पंथात सहभागी करून घेण्यात आले.
हे आहेत 'क'कार ?
- केस (हे केस कधीच कापायचे नाहीत.)
- कडे (कडे स्टीलचे असावे.)
- कंगवा (लाकडापासून बनलेला.)
- कच्छा (गुडग्यापर्यंत सूती विजार.)
- कृपाण (एक प्रकारचा चाकू.)
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, 'क' पासून सुरू होणार्या या 'क' कारांचे महत्त्व..