आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"खाम'ची मोहीम रखडली दोन विभागांच्या वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी नदीप्रवाह मोकळा करण्यासाठी तसेच जीवितहानी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मे महिन्यात चार दिवस खाम नदीपात्रील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यासाठी लाखो रुपये खर्च करून फक्त जहांगीर कॉलनी ते पाणचक्कीपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. हर्सूल आणि लक्ष्मी कॉलनीत नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याचे आढळून आले. मात्र, ठोस कारवाई करण्याऐवजी नगरविकास अतिक्रमण विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखवण्यात येत आहे.
महानगरपालिकेने खामच्या पात्रातील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन चार दिवसांत ८० जणांचे अतिक्रमण काढून त्यांना बेघर केले. उद्देश होता नदीपात्र मोकळे करण्याचा. मात्र, अतिक्रमण विभागाने केवळ जहांगीर कॉलनी ते पाणचक्कीपर्यंतच्या पात्रातील अतिक्रमण काढले. उर्वरित हर्सूल, लक्ष्मी कॉलनी, गरमपाणी आणि अन्य भागातील अतिक्रमण जैसे थे आहे. याविषयी मनपाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना ही बाब माहिती असूनही ते याकडे कानाडोळा करत आहेत. अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाला विचारणा केली असता दोन्ही विभागांकडून केवळ एकमेकांकडे बोट दाखवण्यात येत असल्याचे समोर आले.

एकमेकांकडे बोट
नगररचना विभागाकडून मार्किंग केल्यानंतर अतिक्रमण हटाव विभागातर्फे अतिक्रमण काढण्यात येत होते. नगररचना विभागाने जहांगीर कॉलनी ते पाणचक्कीपर्यंतच्या भागात मार्किंग केले. तेवढेच अतिक्रमण हटवण्यात आले. यावर नगररचना विभागाने स्पष्ट केले की, आम्हाला उपायुक्त, अतिक्रमण विभागप्रमुखांनी आदेश दिल्यावर आम्ही उर्वरित भागातही मार्किंग करू, तर अतिक्रमण उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले की, जेवढे मार्किंग करून दिले तेवढे अतिक्रमण काढले. अजूनही मार्किंग करून दिल्यास अतिक्रमण काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...