आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क खाम नदीत भराव टाकून प्लाॅटिंग, १५० बाय ४० फूट भूखंड पात्रातच तयार केला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भूमाफियांनी चक्क खाम नदीत भर टाकून प्लाॅटिंग केले असून त्याची दणक्यात विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरेफ काॅलनी भागात खाम नदीच्या पात्रात खुलेआम सुरू असलेला हा धंदा मनपाने बंद पाडला असून आज अतिक्रमण हटाव पथकाने या जागेवर उभारण्यात आलेल्या चार पत्र्याच्या शेडस हटवल्या.

औरंगाबादची जलवाहिनी होऊ शकणाऱ्या खाम नदीचे नष्टचर्य जोरात सुरू असून शहरातून जाणाऱ्या या नदीवर दोन्ही बाजूंनी दणक्यात अतिक्रमणे होत असून अनेक ठिकाणी नदीचे पात्र जवळपास लुप्त झाल्यासारखेच आहे.
जेथे वाव आहे तेथे आता भूमाफियांनी हात मारणे सुरू केले आहे. आरेफ काॅलनी भागात असाच प्रकार उघडकीस आला आहे. तेथे काही भूमाफियांनी चक्क खाम नदीच्या पात्रात २०० ट्रॅक्टर माती आणून टाकत चक्क १५० बाय ४० फूट आकाराचा भूखंडच तयार केला. एवढेच नाही तर तेथे प्लाॅटिंग करून धडाक्यात त्याची विक्रीही सुरू केली. अनेकांनी येथे जागा घेतल्या. एवढेच काय तेथे चार जणांनी पत्र्याच्या शेडसही उभारल्या होत्या. या प्रकाराची माहिती मिळताच उपायुक्त रवींद्र निकम, प्रशासकीय अधिकारी महावीर पाटणी इमारत निरीक्षक सय्यद जमशीद त्यांच्या पथकाने धाव घेत आज सकाळपासून कारवाई सुरू केली. बुलडोझर लावून चार शेडस उखडून टाकण्यात आल्या.

कागदपत्रे आली कशी
चक्कनदीचे पात्र असताना काही उपद्व्यापी मंडळींनी हा नवा भूखंड तयार करून त्याची कागदपत्रेही बनवली आहेत. काहींनी हीच कागदपत्रे या पथकाला दाखवण्याचा प्रयत्नही केला. ज्या अर्थी भूमाफियांनी नदी पात्राचीही कागदपत्रे केली त्यावरून एक मोठे रॅकेट या कामात सक्रिय असल्याचे दिसून येते. याप्रकरणी आणखी चौकशी होऊ शकते, असा अंदाज आहे.