आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा संस्थांचा निर्धार, २० गावांत कृती समिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; महाराष्ट्रराज्य स्वयंसेवी संस्था फेडरेशनच्या वतीने विद्यापीठातील नाट्यगृहात शनिवारी आयोजित मेळाव्यात खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या वेळी ग्रामविकास आणि जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्कर्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्था, लोकराज्य समाज विकास संशोधन संस्था, स्नेहल ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ, समीक्षा समाजविकास संस्था, कै. अब्दुल सलाम पठाण ग्रामीण विकास संस्था, संविधान लोकशिक्षण अभियान यांच्या वतीने खाम नदी पुनरुज्जीवन अभियानाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
खाम नदीच्या पाणलोटातील २० गावांत कृती समिती स्थापन करून लोकसभागातून नदीचा विकास करण्यात येणार आहे. या वेळी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ज्ञानेश्वर हानवते, रफिक पठाण, कैलास चव्हाण, प्रमोद कांबळे, रामभाऊ जाधव, कैलास जाधव, सागर हिवराळे, प्रकाश पोहरे, पूजा जाधव, अनिता पोहरे, सुनील नेमाने, सुनील लोहे उपस्थित होते.