आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडाळामध्‍ये दारुबंदीसाठी पुरुषांचा यलगार, अखेर ग्रामसभेने केला दारु दुकान परवाना रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर (खंडाळा) - सुप्रीम कोर्टाने देशी दारू दुकान व बिअर बार राष्‍ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावर स्थलांतर करण्याचे आदेश दिल्‍याने नविन ठिकाणी दारु दुकान सुरु करण्‍यासाठी दारु दुकानदारांची धडपड सुरु आहे. त्यातच देशभरात देशी दारू दुकानांविरोधात महिला रस्‍त्‍यावर येत आंदोलन करताना दिसत आहेत. मात्र तुरळक अपवाद वगळता पुरुष क्‍वचितच या दुकानांना विरोध करताना दिसत आहे. काही ठिकाणी महिलांनी दारूचे दुकान फोडले व दुकान जाळण्याचाही प्रयत्न केला आहे. 

 
काही दिवसांपूर्वी खंडाळा बसस्थानकाजवळील दारुचे दुकान 'गट नंबर 128' मध्ये स्थलांतर करण्याची परवानगी खंडाळा ग्रामपंचायतीच्‍या वतीने देण्यात आली होती. त्या नविन दुकानाजवळच महाविद्यालय व् काही धार्मिक स्थळ होते. याचे वृत्‍त दैनिक  दिव्य मराठी ने 9 मे रोजी 'महिला राज असुनही दारुबंदीसाठी कुणी धजावेना' या मथळ्याखाली प्रसिध्‍द केले होते. वृत्‍त प्रसिध्‍द होताच नागरिकांमध्‍ये संतापाची लाट पसरली. ग्रामपंचायतीमध्‍ये महिला सदस्य असूनही दारू दुकानास परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल नागरिकांतर्फे‍ विचारण्‍यात येऊ लागला. 
 
पुरुषांनी घेतला पुढाकार 
यानंतर 11 मे रोजी सरपंच जमुनाबाई यांच्‍या अध्‍यक्षतेखाली खंडाळा ग्राम सचिवालय येथे ग्रामसभा घेण्‍यात आली. यावेळी सभेत प्रथम दारु दुकानाचे सुरु असलेले बांधकाम बंद करण्‍यात यावे व परिसरात कायमस्‍वरुपी दारुविक्रीवर बंदी घालण्‍यात यावी, अशी मागणी ग्रामस्‍थांनी आक्रमकपणे केली. विशेष म्‍हणजे यासाठी गावातील पुरुषांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांचे आक्रमक स्वरूप बघून मागील सभेत दारु दुकानाच्‍या बांधकामास देण्‍यात आलेला नाहरकत ठराव रद्द करण्‍यात आला. तसेच देशी दारु दुकानाची परवानगी रद्द करण्‍याचा ठराव मंजूर करण्‍यात आला. या पुढे ग्रामपंचायतच्‍या वतीने नविन देशी दारू दुकानास परवाना दिल्यास मोठे आंदोलन छेडून कार्यालयाला कुलुप लावण्यात येइल असा इशारा ग्रामस्‍थांनी दिला आहे. या ग्राम सभेस एकुण 127  ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी 17 ग्रामसदस्यांपैकी केवळ 4 सदस्य उपस्थित होते व  9 महिला सदस्यांची अनुपस्थिती होती.   

दारुमुळे भविष्‍य अंधारात 
दारूमुळे अनेकांची संसार उध्वस्त झाले आहेत. त्यातच कमी वयाच्या मुलांना दारूचे व्यसन लागले असल्याने त्यांचे आयुष्यात अंधार होत चालला असून त्यांची प्रगती खुटंली आहे. यामुळे आपला दारुच्‍या दुकानांना तीव्र विरोध असल्‍याचे गावकऱ्यांनी सांगितले. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...