आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khandelwal Demand Not Accepted Says Bank Employee Aurangabad

खंडेलवाल समितीच्या शिफारशी मान्य करू नका

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बँकिंग क्षेत्रातील बदल अतिशय जाचक आहेत. या संदर्भात खंडेलवाल समितीने केलेल्या 160 शिफारशीपैकी एकही मान्य करण्यात येऊ नये, असे आवाहन बँक कर्मचारी संघटनेचे नेते कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी मंगळवारी केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर त्यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याला महागाई भत्ता मिळतो. मात्र, असंघटित आणि मजुरांचे काय असा प्रश्न त्यांनी केला. सामान्य माणूस वर्तुळाबाहेर फेकला जात आहे. मंदीची झळ सोसल्यानंतर अमेरिका बॅँकाचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या तयारीत आहे. तर लोकसभेत खासगी बॅँकांना परवाने देण्याचे विधेयक मांडणार आहे. हे विधेयक केव्हाही पास होऊ शकते, असेही तुळजापूरकर यांनी सांगितले. बॅँकेचे आंदोलन नेहमी एस.बी.आय., एस.बी.एच. किंवा महाराष्ट्र बॅँकेचे कार्यालयासमोर आंदोलन करतो. मात्र, या वेळी महाराष्ट्र ग्रामीण बॅँकेच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. बॅँक व्यवस्थापन मनमानी करत असल्याचा आरोप कॉम्रेड जगदीश भावठाणकर यांनी केला. महाराष्ट्र ग्रामीण बॅँक युनियनचे अध्यक्ष रमेश घोडके यांनी युनायटेड फोरम ऑफ युनियनचे आभार मानले.
व्यवस्थापन करीत असलेल्या मनमानीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मनोदय घोडके यांनी व्यक्त केला.या वेळी एस.बी.आय. युनियनचे अरुण कुलकर्णी यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी अनेक कर्मचा-यांची उपस्थिती होती.