आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजातीय विवाह केल्याच्या संशयावरून कुटुंबावर बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने समाजाची बदनामी झाल्याच्या संशयावरून खंडणीची मागणी केली आणि जातीबाहेर काढण्याची धमकी दिल्यामुळे पंचायतीच्या 11 जणांविरुद्ध दगडू सांडू गरड (रा. नवा मोंढा, आरतीनगर, पिसादेवी रोड) यांनी सिडको पोलिसांकडे धाव घेतली आहे. अशा स्वरूपाचा गुन्हा शहरात पहिल्यांदाच दाखल झाला आहे.

गरड यांच्या मुलीचा लातूर येथील शरद शिवाजी जोशी यांच्याशी 25 एप्रिल 2008 रोजी विवाह झाला. तेव्हा जातपंचायतीच्या लोकांनी जोशी हे आपल्या समाजाचे नाहीत असा संशय व्यक्त करत गरड यांच्याकडे 51 हजार रुपयांच्या दंडाची (खंडणी) मागणी केली होती.

सदस्यांची दहशत..
जातपंचायतीच्या सदस्यांची नाशकात मोठी दहशत आहे. दर महिन्याला जातपंचायतीची बैठक होते. या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रातील जातीच्या लोकांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र, दंड वसूल करत असताना कोणत्याही स्वरूपाची पावती किंवा कोठेही त्याची नोंद केली जात नाही. पैशांची जातपंचायतीचे सदस्य उधळपट्टी करत आहेत.

अशी आहे समिती..
जातपंचायत अध्यक्ष भास्कर शिंदे, लक्ष्मण शिंदे, शिवाजी कुंभारकर, भीमा गरड, गंगाधर धुमाळ (सर्व रा. नाशिक), दामू पालकर, दिलीप शिंदे, काशीनाथ हिंगमिरे, लक्ष्मण दगडू शिंदे आणि नारायण देवराव धुमाळ व संयुक्त जातपंचायत समिती.