आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या लपंडावामुळे खरिपाची पिके धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - वीज नसल्याने शेतक-यांच्या विहिरीवरील विद्युत पंप चालेनासे झाले आहेत. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही ते देता येत नसल्याने जळत असलेली कपाशी व मक्याचे पीक पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.

औरंगाबाद तालुक्यात नगदी पिके म्हणून शेतकरी कपाशी व मका पिकाकडे वळला आहे. तालुक्यात या वर्षी उशिरा पाऊस झाल्याने पेरणीही उशिरा झाली. त्यामुळे मका पिकाच्या कणसाच्या बगा भरू लागल्या आहेत, तर कपाशी पीक हे ऐन भरात असून बोंडे भरणे व फुटण्यासाठी तसेच पाते फुलण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. नवरात्र किंवा तत्पूर्वी पाऊस पडतो. या पावसाने खरीप पिकांचा निवाडा होतो; परंतु नवरात्र महोत्सव संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. पाऊस येईल, असे चिन्हे दिसत नाहीत. शिवाय परतीचा पाऊसही लांबला आहे. त्यामुळे खरिपातील कापूस व मका ही दोन पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहे. गणेशोत्सवात ब-यापैकी पाऊस झाल्याने खरिपाची पिके तर तरलीच; परंतु विहिरीतही ब-यापैकी पाणी आले जे खरिपातील पिकांना वापरता येईल, परंतु इथेही शेतक-याला त्यांचे दैव आड आले. कारण उन्हामुळे सुकणारी कपाशी पाहून शेतक-यांच्या जीव कासावीस होऊ लागला आहे. कारण विहिरीत पाणी आहे; परंतु केवळ वीज नसल्यामुळे विद्युत पंप चालवता येत नाहीत. ग्रामीण भागात मात्र तर लोडशेडिंगच नव्हे, तर वीजमुक्त झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज आल्यानंतर शेतकरी विहिरीवरील मोटार चालू करून पाणी भरण्यासाठी बा-याकडे वळतो. बा-यावर जाताच पाठीमागे वीज गायब होत. यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

४३,३०० हेक्टरवर कपाशी
१,६२,८४४ हेक्टर मका पिकाची लागवड