आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप हातची पिके गेली; 312 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रिहत छायाचीत्र - Divya Marathi
संग्रिहत छायाचीत्र
औरंगाबाद - मराठवाड्यातल्या ८५२५ गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ३१२ गावांची हंगामी पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. यामध्ये केवळ औरंगाबाद आणि परभणी  या दोनच जिल्ह्यातल्या गावांचा समावेश आहे.  १५ डिसेंबरनंतर अंतिम आणेवारी आल्यानंतर त्या गावात दुष्काळाच्या संदर्भात काय उपाययोजना करण्यात येतील याचा निर्णय राज्यसरकारच्या वतीने घेण्यात येतो. 

३० सप्टेबरनंतर मराठवाड्यातल्या सर्व गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर सुधारीत आणि त्यानंतर अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. मराठवाड्यात  ५९० मिमी इतका पाऊस झाला असून अपेक्षित सरासरीच्या ८१ टक्के इतकाच पाऊस झाला आहे 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ९३ गावांचा समावेश 
औरंगाबाद जिल्ह्यातल्या  १३५३ गावातील एकुण ९३ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी  आली आहे. तर  उर्वरित १२६० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे जाहीर करण्यात आले.  तर परभणी जिल्ह्यातील एकूण ८४९ गावांपैकी २१९ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा  कमी तर उर्वरित ६३० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर करण्यात आली आहे. विभागातील ८५२५ गावांपैकी ३१२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. तर ८२१३ गावांची सरासरी ५० पैशांपेक्षा जास्त आली आहे. 

गंगाखेड तालुक्यातील  सर्वाधिक गावे 
मराठवाड्यातल्या गंगाखेड तालुक्यात १०६ पैकी सर्व १०६ गावांची हंगामी आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. तर पैठण तालुक्यातील १९० गावांपैकी ६१ गावे तर औरंगाबाद तालुक्यातील १९३ गावांपैकी ३२ गावात पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. तर परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या ८२ पैकी ५५ आणि पाथरी तालुक्यातल्या ५८ पैकी ५८  गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. 

अपुऱ्या पावसामुळे खरिपाला बसला फटका 
मराठवाड्यात  आत्तापर्यंत सरासरी ५९० मिमी इतका पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४९१ मिमी इतका पाऊस ४ ऑक्टोबरपर्यंत झाला आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ५९९ (वार्षिक सरासरीच्या ८९ टक्के) आणि पैठण तालुक्यात ४१२ मिमी (वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के)  पाऊस झाला आहे.  

परभणी जिल्ह्यात ४६७ मिमी इतका पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या ६० टक्के इतका पाऊस  झाला आहे. यामध्ये पालममध्ये ३३८ (४८ टक्के)गंगाखेड ३८१ (५४ टक्के) पाथरी ३४० ( वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के) इतका पाऊस झाला आहे. 

अंतिम आणेवारी नंतरच अहवाल राज्यशासनाला देणार 
मराठवाड्यात 312 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. अंतिम आणेवारी जाहीर झाल्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येईल. त्यानंतर राज्यातली सर्व परिस्थिती पाहून कोणत्या सवलती दिल्या जातात याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येईल. 
 
- प्रल्हाद कचरे, उपायुक्त महसूल, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...