आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑलिम्पिकमध्ये खो-खो, कबड्डीसाठी प्रस्ताव देणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्रातील पारंपरिक खो-खो, कबड्डी या खेळांनाचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करावा, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. लवकरच त्यासंबंधीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असून त्यासाठी बीसीयूडीचे अध्यक्ष डॉ. भागवत कटारे रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

खो-खो, कबड्डी यांना जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी ऑलम्पिकमध्ये समावेश करावा यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती बीसीयूडीचे अध्यक्ष डॉ. भागवत कटारे यांनी दिली. कटारे हे ऑलिम्पिकसाठी लंडन येथे दौरा करून नुकतेच आले आहेत. यासंबंधी त्यांना विचारणा केली असता. त्यांनी सांगितले की, तिथल्या आणि आपल्या येथील कामाच्या पद्धतीत खूप फरक आहे. तिथले काही क्रीडा प्रकार आपल्याकडे सुरू व्हावेत, त्यांचे प्रशिक्षक आणि आपल्या येथील क्रीडा प्रशिक्षकांमध्ये आदान-प्रदान व्हावे. यासंबंधी आपली काही जणांशी बोलणी झाल्याचेही ते म्हणाले. कबड्डी आणि खो-खो खेळांचा समावेश ह्या स्पध्रेत करावा, असा प्रस्ताव ठेवला तेव्हा हा खेळ मातीत खेळला जातो, त्यामुळे तो कितपत स्वीकारला जाईल याबद्दल तेथील शिष्टमंडळाने शंका व्यक्त केली. मात्र, तोडगा म्हणून हा खेळ मॅटवरदेखील खेळला जाऊ शकतो. त्यासाठी सर्व जिल्ह्यात या खेळासाठी मॅटसिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. तसेच यासंबंधीचा एक आराखडा, नवीन बदल तयार करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. त्याच्या प्राथमिक बोलणीसाठी रविवारी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी आपण जाणार असल्याचेही डॉ.कटारे यांनी सांगितले.