आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबीयांनी 274 क्विंटल तूर विकली: राज्यमंत्री खाेतकर, 'ती' यादी बनावट असल्‍याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - आपल्या नावावर ३७७ क्विंटल तूर विकल्याचे सांगितले जात आहे, मात्र आपल्या कुटुंबीयांनी प्रत्यक्षात २७४ क्विंटल तूर विकली आहे. तूर विक्री प्रकरणात अापल्याला बदनाम करण्यासाठी खाेटे अाराेप केले जात असल्याचे बुधवारी राज्यमंत्री अर्जुन खाेतकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.
 
त्यासाठी खोतकर यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आलेले अधिकृत पत्र सादर केले. आपण एकाच दिवशी १८७  क्विंटल नाही, तर  १२२ क्विंटल तूर विकली आहे आणि तेवढ्याच वजनाचे पैसे खात्यावर जमा झाले असल्याचेही ते म्हणाले.
 
मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने तपासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली मूळ यादी इंग्रजीमध्ये होती. जालन्यातील एका नेत्याच्या घरात बसून ही यादी  मराठीमध्ये करण्यात आली व हीच बनावट यादी खरी असल्याचे सांगत तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे खोतकर म्हणाले.  
 
ती यादी बनावट : माध्यमांना देण्यात आलेली यादी प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून तयार करण्यात आलेली नाही. त्यावर कुणाचीही स्वाक्षरी किंवा शिक्का नाही. यादीत ८७९ नावे असून त्यापैकी ७० नावे दोन वेळा टाकण्यात आलीत. आपण १४ फेब्रुवारी रोजी ९३.५० क्विंटल तूर विकली, मात्र या बनावट यादीत हीच नोंद दोन वेळा करण्यात आली आहे.   
 
असा होता तुरीचा पेरा : खोतकर यांच्या नावे गाढेसावरगाव येथील गट क्रमांक ३५ मध्ये १ हेक्टर ४४ आर, गट क्रमांक ९१ मध्ये १ हेक्टर ३५ आर, गट क्रमांक १८३ मध्ये १ हेक्टर ६२ आर असा तुरीचा पेरा आहे. सीमा खोतकर यांच्या नावे गाढेसावरगाव येथील गट क्रमांक १११ मध्ये १ हेक्टर ४४ आर तुरीचा पेरा आहे. संजय खोतकर यांच्या नावे हिस्वन बु.येथे गट क्रमांक १९२ मध्ये १ हेक्टर ११ आर, गट क्रमांक १८० मध्ये २ हेक्टर ४० आर, तर गट क्रमांक ९५ मध्ये ३ हेक्टर ६१ आर तुरीचा पेरा आहे, तर योगिता संजय खोतकर यांच्या नावे गाढेसावरगाव येथे गट क्रमांक १११ मध्ये ०.७६ हेक्टर तुरीचा पेरा आहे. संपूर्ण कुटुंबाच्या नावे १३ हेक्टर ७३ आर (३४ एकर १३ आर) तुरीचा पेरा आहे.   
 
अजून यादी नाही, तपास सुरू : तूर खरेदी प्रकरणाच्या याद्या आमच्याकडे आल्यात. यात शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर, त्यांचे सातबारा, पेरापत्रक तपासावे लागणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...