आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन फूट पाण्यातून शाळेची जीवघेणी वाट, लांबचा फेरा वाचवण्यासाठी जीव धोक्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- बोडखागावाजवळ नदीपलीकडे असलेल्या गोरडमळी वस्तीवरील ग्रामस्थांसह मुलांना शाळेत जाण्यासाठी तीन-चार फूट खोल नदीच्या पाण्यातून दररोज वाट काढावी लागते. अासाम, बिहारप्रमाणेच पुरोगामी महाराष्ट्रातदेखील एका गावात नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

२५० लोकसंख्येची गोरडमळी वस्ती अाहे. खुलताबाद तालुक्यापासून ३० किलोमीटर, तर बाजारसावंगीपासून १८ किलोमीटरवर बोडखा गाव असून लगत गंधेश्वर प्रकल्प आहे. प्रकल्पातील बॅकवॉटर नदीद्वारे बोडखापर्यंत असते. नदीवर पूल नसल्याने बोडखा गावापलीकडे गाेरडमळी वस्ती आहे. वस्तीवरून गावात येण्यासाठी नदीवर पूल नाही. पावसाळ्यात नदीला बॅकवॉटरचे पाणी आल्यास पाण्यातून ये-जा करावी लागते. नदीवर पूल बांधावा, अशी मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून वस्तीवरील शालेय समितीचे अध्यक्ष सुधाकर काटकर, शेख रियाज, सय्यद लियाकत, रामदास मोरे ग्रामस्थांनी केली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांना करावी लागते अशी कसरत.....
बातम्या आणखी आहेत...