आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सुकता शिगेला: मुहूर्त ठरला, सरपंचाच्या निवडी होणार टप्प्याटप्प्याने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहे. यात १३ ग्रामपंचायतींची २१ ऑगस्ट, तर १२ ग्रामपंचायतींची निवडणूक २६ ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सरपंच निवडीसाठी गावागावात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहे. मतमोजणीनंतर दोन आठवड्यापासून विजयी उमेदवारांची सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने हालचालींना वेग आला आहे. सर्व विजयी सदस्यांना पत्राद्वारे निवडणूक विभागाने कळवले आहे. यात २१ ऑगस्ट रोजी गोळेगाव, मावसाळा, सराई, कागजीपुरा, गल्लेबोरगाव, कसाबखेडा, वडोद, कनकशीळ, म्हैसमाळ, निरगुडी, धामणगाव, तर २६ ऑगस्टला गदाना, खिर्डी, बोडखा, सुलतानपूर, वेरूळ, टाकळी राजेराय, सोनखेडा, पिंप्री, ताजनापूर, बाजारसावंगी आदी ठिकाणी निवडी होणार आहेत.
प्रतिनिधी करमाड
औरंगाबाद तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन निकालही जाहीर झालेले आहेत. या ग्रामपंचायतींचे नवे कारभारी ठरविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने २९ २६ ऑागस्ट सप्टेंबर अशा तीन तारखा जाहीर केल्या आहेत.

औरंगाबाद तालुक्यात एकूण १४४ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ७६ ग्रामपंचायतीची मुदत १४ सप्टेंबर त्यापूर्वी समाप्त होत आहे. या ७६ ग्रामपंचायतीमधील ७१७ पाच ग्रामपंचायतीमधील अशा एकूण ७२५ सदस्यांच्या जागा निवडण्यासाठी तालुक्यात ऑगस्ट रोजी निवडणुका घेण्यात आल्या. ७१७ पैकी ११५ अविरोध झाल्याने प्रत्यक्षात ६०२ जागांसाठी मतदान झाले. यासाठी १,५६८ वैध अर्ज होते. निवडणूक झाल्यानंतर ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले. त्यानुसार औरंगाबाद तालुक्यातील ७६ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक घेणे कामी २१ २६ ऑगस्ट तसेच सप्टेंबर या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकीसाठी बोलाविण्यात आलेली सभा ग्रामपंचायतींच्या कार्यालयात किंवा चावडीत किंवा गावातील इतर योग्य ठिकाणी आणि सभेच्या तारखेस दुपारी वाजता भरवण्यात येईल. निवडून आलेल्या पंचायतीच्या प्रत्येक सदस्याला तीन दिवसांपूर्वी या सभेची नोटीस दिली जाईल.

२१ ऑगस्ट
बकापूर,पिंपळखुटा, खोडेगाव, वरझडी, पंढरपूर, आडगाव बु., कोळघर, भालगाव, दुधड, जोडवाडी, चिंचोली, अब्दीमंडी, कचनेर, वळदगाव, करंजगाव, गाडीवाट, पाटोदा, आडगाव खुर्द, दरकवाडी, गोपाळपूर, परदरी, लिंगदरी, सावंगी, भाबर्डा, भिंदोन

२६ ऑगस्ट
घारेगावएकतुनी, गिरनेरा, जळगाव, चौका, घारेगाव पिंप्री, कुंभेफळ, वाहेगाव, पिसादेवी, चित्तेपिंपळगाव, पळशी, सिंदोन, शेकटा, आपतगाव, गाढेजळगाव, शेवगा, शेंद्रा कमंगर, चितेगाव, गेवराई कुबेर, पिरवाडी, गेवराई ब्रुकबाँड, बाळापूर, ओव्हर, वडखा, मोरहिवरा

2 सप्टेंबर
आडगावसरक, करमाड, आडगाव माहुली, डोणगाव, पोखरी, नायगाव, वरूड काझी, मंगरूळ, डायगव्हाण, ढवळापुरी, नायगव्हाण, देमणी, सय्यदपूर, मांडकी, शेणगाव, शेंद्राबन, कोणेवाडी, शिवगड तांडा, गारखेडा, झाल्टा, माळीवाडा, मुरूमखेडा, रावरसपुरा, सांजखेडा, खामखेडा.
~~~~~~~~