आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबादेत राजकीय चर्चेचे गु-हाळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉँग्रेस, मनसे व सेक्युलर जनता दल निवडणूक रिंगणात स्वतंत्रपणे उतरणार असून राष्ट्रवादीसोबत आमदार प्रशांत बंब निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा असली तरी राष्ट्रवादीने या वृत्ताचे खंडण केले आहे.
सेना-भाजप यांची अद्यापपर्यंत भूमिका स्पष्ट नसल्याने युती कायम राहणार की, स्वतंत्र लढणार याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार असल्याचे सेना तालुका अध्यक्षांनी कळवले आहे. आमदार प्रशांत बंब मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क साधत असून लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रमास आवर्जून भेटी देत आहेत. कॉँग्रेसचे अशोक पाटील डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर, तालुकाअध्यक्ष जगन्नाथ पाटील खोसरे यांनी विविध गट व गणात जावून सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याने त्या दृष्टीने उमेदवारांची सर्व बाजूने चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
खुलताबाद - तालुक्यात 3 गट असून बाजारसावंगी गटात दहा हजार 573 पुरुष, 11 हजार 333 पुरुष, 9589 स्त्री मतदार आहेत. वेरूळ गटात पुरुष मतदार 11,193, स्त्री मतदार 9964 आहेत.
वेरूळ गट - वेरूळ, कसाबखेडा, मंबापूर, शूलिभंजन, नंद्राबाद, गल्लेबोरगाव, चिंचोली, आखतवाडा, पिंप्री निरगुडी, पळगाव, तिसगाव, पळसवाडी या गावांचा समावेश आहे.
बाजारसावंगी गट - बाजारसावंगी, बोडखा, सावखेडा, गंधेश्वर, दरेगाव, पाडळी, सोबलगाव, झरी वडगाव, लोणी, टाकळी धामणगाव, गंगापूर रेल, कनकशिळ, म्हैसमाळ, लामणगाव, सराई, सालूखेडा या गावांचा समावेश आहे.
गदाना गट - गदाना, भराडी, ममानापूर, गोळेगाव, धोडेगाव, खिर्डी, कागजीपुरा, सोनखेडा, मावसाळा, रसूलपुरा, ताजनापूर, मुमराबाद, बडोद (खु.बु.) येसगाव, देवळाणा, सुलतानपूर, भाडेगाव, खांडी पिंपळगाव या गावांचा समावेश आहे.
* जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत प्रथमच उतरत असून सक्षम उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. येत्या 20 तारखेला सर्व उमेदवारांची नावे जाहीर करणार आहोत. दिलीप बनकर, मनसे जिल्हाध्यक्ष
* सेक्युलर जनता दल पुन्हा सक्रिय झाला असून काही मोजकेच कार्यकर्ते ग्रामीण भागात आहेत, परंतु यंदा सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे.- भाऊसाहेब जाधव, तालुकाध्यक्ष सेक्युलर जनता दल
* पं. स.वर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपली ताकद पणाला लावत असून उमेदवार देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.- गणेश अधाने, तालुकाध्यक्ष शिवसेना
* राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची चाचपणी करूनच पक्षाचे तिकीट देणार असून आमदार बंब यांच्याशी वरिष्ठांकडून अद्याप आघाडीबाबत कोणतेही आदेश आले नाहीत. या निवडणुकीत आमदार बंब यांच्याशी आघाडीचे चिन्हं दिसत नसले तरी वरिष्ठ पातळीवर काय घडामोडी घडत आहेत, याबाबत आम्ही काहीही सांगू शकत नाही. आघाडी झाली तर पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली जाईल. - राजू वरकड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष