आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर, रुग्ण संतप्त एक वैद्यकीय अधिकारी रजेवर, दुसरे ट्रेनिंगसाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील गदाना प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य विभागाने वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. येथील एक वैद्यकीय अधिकारी सुटीवर असून दुसरे अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले आहे. यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहे. सोमवारी रुग्णालयात डॉक्टर नसल्याने गोळेगाव येथून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची गैरसोय झाली. सदर महिलेला नाइलाजास्तव खुलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले होते. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
खुलताबाद तालुक्यात शहारासह चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यात गदाना आरोग्य केंद्राचा समावेश आहे. चारपैकी गदाना बाजारसावंगी वेरूळ या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर निगराणीसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. परंतु तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची नुकतीच बदली झालेली अाहे.
त्यात गदाना प्राथमिक आरोग्य केंद्रावरही डाॅक्टर नसल्याने गदाना आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी जिल्हा अरोग्य अधिकारी खतगावकर यांना विचारले असता ते म्हणाले, गदाना प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर रजेवर गेले असले तरी त्या ठिकाणी तात्काळ वद्यैकीय अधिकारी प्रफुल्ल गायकवाड यांना मंगळवारपासून गदाना केंद्रावर पाठवण्यात येणार आहे. तसे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...