आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khwada Film Director Bhau Karhade Present In Career Guidance Camp In Aurangabad

नाट्यक्षेत्र, चित्रपटात ठसा उमटवा : दिग्दर्शक कऱ्हाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्रकारिता विभागात करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या वेळी दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे. डॉ. वि. ल. धारूरकर आदी.)
औरंगाबाद- मराठवाड्याच्या मातीत अस्सल गुणी कलावंतांची वानवा कधीच नव्हती आणि पुढेही असणार नाही. गरज आहे ती आपल्यातील कलाकौशल्य जिद्दीला रंगमंच, चित्रपटातून पुढे आणण्याची. मेहनत जिद्दीच्या बळावर चित्रपट आणि नाट्य प्रसारमाध्यमांतून आपला ठसा उमटवा, असे आवाहन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'ख्वाडा' चित्रटाचे दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या जनसंवाद विभागात बुधवारी करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या वेळी उद््घाटक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, ज्योती अंबेकर (वृत्तसंपादक, सह्याद्री), विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे, "लिबरल आर्ट््स’चे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या वेळी भाऊ कऱ्हाडे म्हणाले, महाराष्ट्रात तरुणांसमोर आता पत्रकारिता सिनेसृष्टी हे लोकप्रिय आव्हानात्मक क्षेत्र करिअरसाठी निवडण्याचा ट्रेंड वाढला आहे. विशेषत: मराठी सिनेमाने कात टाकली असून गाव, वाडीतांड्यावरील कलावंतांनाही संधी मिळते आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी कोणताही न्यूनगंड बाळगता आवडीचे क्षेत्र निवडावे, असेही ते म्हणाले.
या वेळी धनंजय लांबे म्हणाले, कला, मग ती चित्रकला असो की शिल्पकला, कौशल्य असावे लागते. पत्रकारिता करण्यासाठी तर नवनिर्मिती चिकित्सा हे गुण असलेच पाहिजेत. आगामी काळात फोर जी तंत्रज्ञान येणार असून माध्यमांचे क्षेत्र झपाट्याने बदलणार आहे, त्याला समोरे जा, असेही ते म्हणाले. इलेक्ट्रॉनिक माध्यमात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी मुद्रित माध्यमात काही वर्षे अनुभव घेणे गरजेचे आहे, त्याशिवाय परिपूर्ण अभ्यासू पत्रकार म्हणून करिअर घडू शकत नाही, असे ज्योती अंबेकर म्हणाल्या. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ गोदाम, कृष्णा केंडे, दीपक पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा. जयदेव डोळे, डॉ.दिनकर माने यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. गाथा वाघमारे हिने सूत्रसंचालन केले. श्यामल इंगळे हिने आभार मानले.