औरंगाबाद - नदीत अंघोळीसाठी गेलेल्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून अंत झाला. ही घटना चिकलठाण्यातील पीरवाडीत शुक्रवारी घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
पीरवाडी येथील शेख रशीद यांची मुले शेख रईस शेख रशीद (५), शेख सानिया शेख रशीद (७) दोघे बहीण- भाऊ दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातीलच दर्गा पुलाजवळील नदीत अंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ झाला तरी मुले घरी आल्याने घरच्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी वाजेच्या सुमारास दोघेही बेशुद्ध अवस्थेत सापडून आले. त्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांची प्राणज्योत मालवली होती.