आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेत विक्रीस विरोध; पत्नीचा जाळून ठार मारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर - शेत विक्री करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला जाळून ठार मारल्याची घटना शुक्रवारी (५ ऑगस्ट) रोजी रात्री दहाच्या सुमारास शिऊरजवळील पेंडेफळ शेतवस्तीवर घडली. हिराबाई पठारे (४४) असे मृत महिलेचे नाव आहे. पेंडेफळ (ता.वैजापूर) येथील रहिवासी असलेले पांडुरंग पुंडलिक पठारे यांना घरची शेतजमीन विकायची होती. मात्र, ही शेतजमीन विक्री करण्यास त्यांची पत्नी हिराबाई पठारे (४४) यांचा विरोध होता. यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. याच कारणावरून पत्नी हिराबाई पठारे यांच्यासोबत शुक्रवारी पुन्हा वाद होऊन दारूच्या नशेत पांडुरंग पठारे याने रात्री दहाच्या सुमारास हिराबाईच्या अंगावर रॉकेल ओतले व जाळून जागीच ठार केले. मृत हिराबाईचा भाऊ अनिल जयवंतराव गजहंस (रा.डोणगाव, रायपूर) यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग पुंडलिक पठारे (४८) याच्या विरोधात शिऊर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी नंतर मृत हिराबाई पठारे यांच्यावर पेंडेफळ येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश पाटोळे हे करत आहेत.
पुढे वाचा... नानेगाव फाट्यावर तरुणाचा मृतदेह, खून झाल्याचे उघड
बातम्या आणखी आहेत...