आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडूच्या अंगावर पेट्रोल ओतून खून, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- उसनवारी दिलेले ५० हजार रुपये मागण्यास गेलेल्या साडूला पत्नीच्या व इतरांच्या मदतीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना २२ जून रोजी सकाळी रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. उपचारदरम्यान २६ जून रोजी गंभीररीत्या भाजलेल्या बाळासाहेब वाघ (५४ रा. मिटमिटा, औरंगाबाद) यांचा मृत्यू झाला.
 
यासंदर्भात मृत वाघ यांचा मुलगा आदिनाथ (२४) याच्या फिर्यादीवरून आरोपी साडू लक्ष्मण निकम, जयश्री निकम, संतोष राजपूत (सर्व रा.रांजणगाव शेणपुंजी) शिवाजी भोंगळ (रा. आंबा ता.कन्नड) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात १० जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,मृत बाळासाहेब यांनी मेहुणी जयश्रीला हात उसने ५० हजार रुपये दिले होते. दरम्यान फोनवर वारंवार पैसे देण्याची मागणी केल्यानंतर टाळाटाळ करणाऱ्या मेहुणीकडे २१ जून रोजी रांजणगाव येथील त्यांच्या घरी जाऊन बाळासाहेब यांनी उसन्या पैशांची मागणी केली, त्यावर लक्ष्मण त्याचा मावसभाऊ शिवाजी दोघांनी मिळून बाळासाहेब यांना शिवीगाळ करत मारहाण केली दुसऱ्या दिवशी पैसे घेण्यास परत येण्याचे सांगून त्यांना परत पाठवले.
 
दरम्यान सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब २२ जून रोजी सकाळी वाजता रांजणगाव येथे लक्ष्मण निकम यांच्या घरी उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेले, असता त्यांना पुन्हा शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान पूर्व तयारीत असणाऱ्या संतोष राजपूतने पेट्रोलने भरलेली बाटली लक्ष्मण निकमकडे दिली असता त्यांनी बाटलीतील पेट्रोल बाळासाहेब वाघ यांच्या दिशेने फेकले त्याच वेळी बचावासाठी पुढे पळणाऱ्या बाळासाहेब यांना शिवाजी भोंगळने पकडून ठेवले, तर जयश्री निकमने काडीपेटी पेटून बाळासाहेबांच्या दिशेने पुढे केली. त्याच वेळी त्यांनी बचावासाठी तोंड फिरवले, मात्र बाळासाहेब यांचा मागील भाग तसेच त्यांना पकडून ठेवणारा शिवाजी भोंगळ हादेखील आगीत होरपळून निघाला.

जळत्या स्थितीमध्ये अंगणात धावणाऱ्या बाळासाहेब यांच्या अंगावर परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आग विझवली घटनेची माहिती पोलिसांना दिली. मिळालेल्या महितीवरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीररीत्या भाजलेल्या बाळासाहेब यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र,उपचारादरम्यान २६ जून रोजी बाळासाहेब वाघ यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान १० जुलै रोजी त्यांचा मुलगा अादिनाथ वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी लक्ष्मण निकम, जयश्री निकम, संतोष राजपूत रा.रांजणगाव शेणपुंजी, शिवाजी भोंगळ रा. आंबा ता.कन्नड यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे करत आहेत.
 
मुलगा अादिनाथ वाघ याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीररीत्या भाजलेल्या बाळासाहेब यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र,उपचारादरम्यान २६ जून रोजी बाळासाहेब वाघ यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान १० जुलै रोजी त्यांचा मुलगा अादिनाथ वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी लक्ष्मण निकम, जयश्री निकम, संतोष राजपूत रा.रांजणगाव शेणपुंजी, शिवाजी भोंगळ रा. आंबा ता.कन्नड यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...