आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंना जिवे मारण्याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ जालना - भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना ई-मेलद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विलास देशमुख असे धमकी देणाऱ्याचे नाव असून या प्रकरणी दानवे यांच्या स्वीय सहायकाने पोलिसांना तक्रार दिली आहे.शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास खासदार दानवे यांच्या भोकरदन येथील संपर्क कार्यालयाच्या मेलवर ही धमकी देण्यात आली आहे. यात भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकी सोडा अन्यथा जिवे मारू, असा उल्लेख केला आहे. हा मेल मिळताच भोकरदन कार्यालयातील गजानन तांदुळजे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार खासदार दानवे यांचे स्वीय सहायक राजेश जोशी यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...