औरंगाबाद- गेल्या २३ वर्षांपासून मनपाच्या सेवेत बालवाडी शिक्षिका सेविका म्हणून काम करणाऱ्या १३५ महिलांना आजही सेवेत कायम केलेले नाही. एवढेच नाही, तर दहा वर्षांपूर्वी मानधन हजार रुपये करण्याचा ठराव मंजूर करूनही प्रत्यक्षात हजार रुपये हातावर ठेवण्यात येतात. या महिलांनी महापौर त्र्यंबक तुपे यांना निवेदन देऊन मानधन दहा हजार रुपये करावे किंवा सेवेत कायम करावे, अशी मागणी केली आहे.
मनपातर्फे चालवण्यात येणाऱ्या बालवाड्यांत १२० शिक्षिका १५ सेविका कार्यरत आहेत. या १२० शिक्षिकांना १९९२ पासून ३०० रुपये मानधन देण्यात येत होते. नंतर ते दहा वर्षांनी १८०० रुपये करण्यात आले. मानधन वाढीसाठी लढा दिल्यानंतर शिक्षिकांना हजार रुपये मानधन देण्याचा ठराव १८ जानेवारी २००५ च्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. प्रत्यक्षात त्यांचे मानधन हजार रुपये करण्यात आले. ते आजतागायत तेवढेच आहे. गेल्या दहा वर्षांत अनेकदा मागणी करूनही त्यात वाढ करण्यात आलेली नाही. याबाबत महापौर आयुक्त यांना वारंवार भेटून निवेदने दिली, पण त्याचा उपयोग झाला नाही. आता या शिक्षिकांनी, सेवेत कायम करा किंवा मानधन वाढवून किमान १० हजार रुपये करावे, अशी मागणी केली आहे. त्यावर महापौरांनी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात प्रतिभा मांटे, स्मिता पुरी, दया पांगारकर, प्रमिला तायडे, संध्या मैंद, छाया वानखेडे, आशा केणेकर यांचा समावेश होता.