आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : किराडपुरा परिसरात स्फोट, दोन मुले गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटात 10 आणि 11 वर्षांचे एक मुलगा आणि मुलगी जखमी झाले. - Divya Marathi
स्फोटात 10 आणि 11 वर्षांचे एक मुलगा आणि मुलगी जखमी झाले.
औरंगाबाद - मुस्लिम बहुल किराडपूरा भागात झालेल्या स्फोटात दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. किराडपुरा येथील रहिमानिया कॉलनीत हा स्फोट झाला. यात तीन जण जखमी झाले असून दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील एक 6 वर्षांचा असल्याची माहिती आहे. 
स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून, स्फोट नेमका कशाचा झाला याता तपास सुरु आहे. 
 
कसा झाला स्फोट 
- मुले सकाळी दुध घेऊन येत होते. तेव्हा रस्त्यावर पडलेल्या स्फोटक वस्तूवर मुलीचा पाय पडला आणि स्फोट झाला. 
- तिला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलाचाही स्फोटकावर पाय पडला आणि दुसरा स्फोट झाला. 
- स्फोटाचा आवाज ऐकून त्यांच्या जवळच असलेल्या मुलाच्या मामाने त्यांना उचलून घेतले आणि हॉस्पिटलला गेऊन गेला. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...