आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCP नेत्‍याला हात लावला तर, पळता भुई थोडी होईल: सोमय्यांविरोधात कार्यकर्ते पेटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘भुजबळ यांच्यापाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे यांना तुरुंगात जावे लागेल,’ या खासदार किरीट सोमय्यांच्या प्रतिक्रियेवर राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते, समर्थक चांगलेच संतापले आहेत. सध्‍या सोशल मीडियावर सोमय्या यांच्‍यावर जोरदार टीका केली जात आहे. तर, भाजप समर्थकांनी मात्र त्‍यांचे कौतुक केले. किरीट सोमय्या टार्गेट..
- राष्‍ट्रवादीचे समर्थक, कार्यकर्त्‍यांनी किरीट सोमय्या यांना सोशल मीडियावर टार्गेट केले आहे.
- भुजबळांच्‍या अटकेचा निषेध करत अनेकांनी सोमय्या यांच्‍यावर नेम साधला.
- "सोमय्या जोतिष्‍याच्‍या भूमिकेत आहेत. आता कोणाचा नंबर लागणार याची ते भविष्‍यवाणी सांगतात.' असे काहींनी म्‍हटले आहे.
- आता यापुढील नंबर कोणाचा लागणार, असा प्रश्‍नही विचारला जातोय.
मग पळता भुई थोडी होईल..
"अहो किरीटभाऊ, सरकार तुमचे आहे म्‍हणून तुम्‍ही काहीही कराल असे समजत असाल तर एका राष्‍ट्रवादीचा कार्यकर्ता म्‍हणून सांगतो की, भुजबळ साहेबांना अटक केल्‍याचा जाहीर निषेध तर करतोच पण अजून एका पण राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍याला हात लावायचा प्रयत्‍न जरी केला ना तरी हा अख्‍खा महाराष्‍ट्र पेटेल. मग तुम्‍हाला मात्र पळता भुई थोडी होईल, जग जा गुजरातला..' असा मजकूर एका अकाउंटवर शेयर करण्‍यात आला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, फेसबुकवरील अशाच काही संतापजनक प्रतिक्रीया..