आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क‍िरीट सोमय्यांचा पुतळा जाळण्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (चार फेब्रुवारी) भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेऊन त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौक उड्डाणपुलाखाली हे आंदोलन करण्यात आले. सोमय्या मुर्दाबाद, भुजबळ झिंदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या.

आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, सरचिटणीस एम. एल. पवार, संजय सोनवणे, संदीप पवार, सुरेश बनसोड, समता परिषदेच्या युवा आघाडीचे शहराध्यक्ष विशाल एडके, संदीप घोडके, आनंद चौधरी, पांडुरंग लवंगे यांचा समावेश होता.