आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने, जेल भरोनंतरही झालरपट्टय़ाची सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहराचा झालरपट्टाच बेकायदा असल्याचा आरोप करून त्याच्या सुनावणीला विरोध करणार्‍या आंदोलकांनी निदर्शने तसेच जेल भरो केल्यानंतर सुनावणी सुरूच राहिली. गुरुवारी सुरू झालेली सुनावणी आंदोलकांनी उधळून लावली होती. मात्र कालपासून सुरू झालेल्या सुनावणीवर आंदोलनाचा काहीही परिणाम न झाल्याने सर्व प्रकरणांची सुनावणी येत्या दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद झालर किसान विकास संघर्ष समितीने हे आंदोलन केले. गुरुवारी सुनावणी स्थगित झाल्यानंतर ते सोमवारी सुरूच होणार नाही, असा समितीचे अध्यक्ष अबुल आला हाशमी यांचा कयास होता. मात्र सोमवारी सुनावणी सुरू झाली. त्यामुळे समितीच्या वतीने मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार दुपारी बारा वाजता निदर्शने सुरू झाली. त्याआधीच पोलिस दाखल झाले होते. निदर्शने सुरू होताच पोलिसांनी आंदोलकांना अटक करणार असल्याचे सांगितले आणि 18 जण तातडीने पोलिसांच्या मोटारीत बसले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

इकडे सिडको कार्यालयाबाहेर निदर्शने तसेच जेल भरो सुरू असताना आत दालनात सुनावणी सुरू होती. एक वाजेनंतर ही सुनावणी सुरू राहिली, तरीही तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

असे आहे चित्र
झालरपट्टय़ासाठी दाखल झालेल्या हरकती- 2338
गुरुवारी पहिल्या दिवशी झालेली सुनावणी -30
स्थगितीनंतर सोमवारी सुनावणी सुरू झाली. आजपर्यंत झालेली सुनावणी- 178 प्रकरणे

तीव्र आंदोलन करू
हा आराखडाच चुकीचा असल्याचा आमचा दावा कायम आहे. आज जेल भरो आंदोलन केले. यानंतर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल. अबुल आला हाशमी, अध्यक्ष, झालर किसान संघर्ष समिती.