आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदारावर चाकूहल्ला; दोन हल्लेखोरांना अटक; वाळूजमध्ये हल्ल्यांचे सत्र सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी किशोर लोहकरे, कुणाल नंदवंशी - Divya Marathi
आरोपी किशोर लोहकरे, कुणाल नंदवंशी
वाळूज- घर खरेदीच्या व्यवहारातून वाळूज औद्योगिक परिसरातील कंत्राटदारावर तिघांनी चाकूहल्ला केला. गुरुवारी (४ मे) रात्री रांजणगावात ही घटना घडली. शिवाजी भानुदास तायनात (३४, रा.द्वारकानगर, बजाजनगर) असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर बजाजनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून एक फरार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी दिली. 

औद्योगिक परिसरातील कारखान्यांत कामगार पुरवणारे कंत्राटदार शिवाजी तायनात किशोर लोहकरे (३०, रा.कमळापूर) यांच्यात दीड वर्षापूर्वी घर खरेदीचा व्यवहार झाला होता. प्लाॅटिंगचा व्यवसाय असल्यामुळे कमी किमतीत घर खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत लोहकरे याने लाख रुपये तायनात यांच्याकडून घेतले. मात्र, लोहकरे घर किंवा रक्कम परत देत नसल्यामुळे तायनात यांनी तगादा लावला होता. मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोहकरे रांजणगाव फाटा येथून फार्च्युन कारने ( एमएच ५० ७२७४) जात होते. रांजणगाव परिसरातील एका हाॅटेलसमोर त्यांना तायनात दिसले. आरोपी किशोर लोहकरे, कुणाल नंदवंशी (२३, रा.बेगमपुरा) वानखेडे (पूर्ण नाव पत्ता नमूद नाही) या तिघांनी मागील व्यवहारांवरून तायनात यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. 

आरोपी लोहकरे साथीदारांनी तायनात यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण केली. आरोपी लोहकरेने तायनात यांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तायनात यांनी तो वार चुकवला. परंतु, तायनात यांच्या उजव्या मांडीवर वार बसला. एकापाठोपाठ एक असे तीन वार लोहकरे याने केले. वेदनांमुळे आरडाओरड करणाऱ्या तायनात यांचा आवाज ऐकून बघ्यांची गर्दी वाढताच तिन्ही आरोपी फरार झाले. 

हल्ले थांबेनात
२८एप्रिल रोजी रांजणगाव शेणपुंजी येथील भीमराव रमेश आरके (रा.रांजणगाव) रिक्षाचालकावर किरकोळ कारणावरून चाकूहल्ला करण्यात आला होता. याच दिवशी ठेकेदाराने कामगारास मारहाण केली. एकापाठोपाठ हल्ल्यांच्या घटना घडत असल्यामुळे उद्योजक, नागरिक धास्तावले आहेत. 

दोन आरोपी गजाआड; एक जण फरार 
घटनेचीमाहिती मिळताच पोलिस निरीक्षक नाथा जाधव, पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख,पोहेकाँ वसंत शेळके,बाळासाहेब आंधळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी तायनात यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावरील आरोपींची कार जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आली. मुख्य आरोपील लोहकरे त्याचा साथीदार आरोपी कुणाल नंदवशी या दोघांना महाराणा प्रताप चौकातून रात्री ११ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. तिसरा आरोपी वानखेडे फरार असून त्यालाही जेरबंद करणार असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यानी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...