आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा घडलेला थरार, सानिया मोटर्सच्या चार कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोनवाहनांच्या धडकेनंतर झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. कारमधील चौघांनी सानिया मोटर्सच्या कर्मचाऱ्यांवर सपासप चाकूचे वार करत त्यांना गंभीर जखमी केले. घटनेनंतर हल्लेखोर क्षणार्धात पसार झाले. हा थरार बुधवारी दुपारी चारच्या सुमारास जालना रोडवरील खंडपीठासमोर घडला. जखमींमध्ये सानिया मोटर्सचे व्यवस्थापक अनिल जाधव (३०), अशोक साळुंके (३०), शेख फारूक (२५) आणि गजानन ढवळे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून रात्री उशिरापर्यंत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू होते.
सानिया मोटर्सच्या टाटा २०७ (एमएच १८ एम ८३३३) या गाडीत चालक संतोष पालोदकर, अशोक साळुंके आणि प्रशांत दांडेकर मुकुंदवाडीकडे जात होते. खंडपीठासमोर गतिरोधक आल्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी केला. दरम्यान, शेवरोले (एमएच ०२ एएफ ५५५) या गाडीने त्यांना मागून धडक दिली. त्यामुळे चालक संतोष याने गाडी थांबवली.

हल्लेखोर नशेत
चाकूहल्लाकरणारे चौघेही मद्यप्राशन केलेले असावेत, असे त्यांच्या हावभावावरून वाटत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बघ्यांनादेखील हल्लेखोर शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवत होते. ते रोशन गेट परिसरातील असल्याची चर्चा होती. पसार झालेल्या हल्लेखोरांवर भारतीय दंड विधान कायद्याच्या ३२६, ३२४, ३३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.