औरंगाबाद - एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशात मॅगीच्या काही नमुन्यांत मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आढळले. त्यानंतर मॅगीबाबत देशभर संभ्रम निर्माण झाला. त्यातून अनेक राज्यांच्या अन्न व औषधी प्रशासनाने मॅगीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. देशभर मॅगीच्या विरोधात बंदी घालण्याच्या बातम्यांमुळे मॅगी बनवणा-या नेस्ले कंपनीचे शेअर्स बुधवारी धडाधडा कोसळले. त्या मॅगीविषयी...
मॅगीचा इतिहास
ज्युलियस मॅगी यांनी १८७२ मध्ये स्वित्झर्लंडमधील चाम येथे मॅगी सर्वप्रथम सादर केली. मजुरांसाठी इन्स्टंट सूप म्हणून मॅगीचा वापर त्या वेळी झाला. त्यानंतर मॅगीचे नूडल्स, सॉस, बॉल्युअन क्युबज (रस्सा) आले. प्रथिनयुक्त सूप म्हणून मॅगीला चांगली मागणी आली. १९४७ मध्ये मॅगी कंपनी नेस्ले-अलिमेंटा एस.ए. या कंपनीत विलीन झाली.
एमएसजी काय ?
मोनोसोडियम ग्लुटामेट अर्थात एमएसजी हे नैसर्गिकरीत्या आढळणारे एक अमिनो आम्ल आहे. यालाच सोडियम ग्लुटामेट असे म्हणतात. एमएसजी टोमॅटो, अळिंबी (मशरूम), बटाटे व इतर भाजीपाल्यात आढळते. चववर्धक (फ्लेव्हर एन्हान्सर) म्हणून एमएसजीचा वापर अन्न प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो. भारतीय अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार एमएसजीचा वापर नूडल्समध्ये करता येत नाही.
भारतातील पहिले इन्स्टंट नूडल्स
मॅगी हे भारतातील पहिले इन्स्टंट नूडल्स आहेत. देशातील नूडल्सच्या बाजारपेठेत मॅगीचा वाटा ६० ते ७० टक्के आहे. मलेशियात मॅगीचा वाटा ३९ टक्के आहे.
मलेशियात स्थानिक मॅगी गोरेंगे
न्यूझीलंडमध्ये मॅगीचे कांदा मिक्स सूप लोकप्रिय आहेत. मलेशियात मॅगी न्यूडल्स पासून स्थानिक पातळीवर फ्राइड नूडल्स बनवतात. त्यास मॅगी गोरेंगे असे म्हणतात.
शिसे अपायकारक
प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास पोटदुखी, संभ्रमवस्था, डोकेदुखी, अॅनिमिया, चिडचिड होणे. प्रमाण अति झाल्यास फेफरे येणे, कोमा, प्रसंगी मृत्यू होऊ शकतो.
एमएसजीमुळे काय होते : डोकेदुखी व अस्वस्थता वाढते. यालाच चायनीज रेस्तराँ सिंड्रोम असे म्हणतात
पुढे वाचा, मॅगी २ मिनिट नूडल्समधील घटक