आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकर्‍यांना लुटणार्‍या ‘कोयता’ गँगच्या दोघांना शिताफीने अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देहू-आळंदीला ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनासाठी येणार्‍या वारकर्‍यांना लुटणार्‍या ‘कोयता गँग’च्या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विना क्रमांकाची एक हीरोहोंडा दुचाकी पोलिसांनी जप्त केली. या दोघांसह सहा जणांची ही गँग असून यातील तीन जण सध्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. किरण ऊर्फ आकाश मुरलीधर आरू (19), सोपान लक्ष्मण वरणकर (20, रा. आळंदी) अशी त्यांची नावे आहेत.
कोयत्याचा धाक दाखवून आळंदीकडे जाणार्‍या वारकर्‍यांना लुटणार्‍या ‘कोयता’ गँगची मोठी दहशत पुणे आणि आळंदीत आहे. किरण आरू हा लॅब टेक्निशियनचे काम करतो, तर सोपान वरणकर हा पेंटिंगचे काम करतो. किरणसह त्याच्या साथीदारांनी 2012 मध्ये एका भाविकाला लुटले होते. या प्रकरणात त्याला आळंदी पोलिसांनी अटक केली होती. किरणची मोठी बहीण आणि त्याचे वडील मुरलीधर आरू हे दोघेही (डीएचएमएस) डॉक्टर आहेत. सोपानवर दुचाकी चोरीचा गुन्हा आळंदीमध्ये दाखल आहे.
सोपान आणि किरण चोरलेली दुचाकी औरंगाबाद येथे विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांना मिळाली. त्यांच्या आणि अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सहायक फौजदार शेख आरेफ, जमादार कैसर पटेल, शेख रशीद, मनोज चव्हाण, सिद्धार्थ थोरात, अफरोज पठाण, भानुदास पवार, प्रभाकर राऊत यांनी बाबा पेट्रोल पंपाच्या चौकात गुरुवारी सायंकाळी सात वाजता पकडले.