आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केबीसी’च्या नावाखाली गंडा घालण्याचा प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तुमची ‘कौन बनेगा करोडपती’ या स्पर्धेसाठी निवड झाल्याची बतावणी करून सिडको एन-5 भागातील रहिवासी डॉ. आर. के. रावळकर यांना दहा हजारांचा गंडा घालू पाहणार्‍या भामट्यांचा प्रयत्न फसला.

‘कौन बनेगा करोडपती’ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी डॉ. रावळकर 2009 पासून प्रयत्नशील होते. मात्र, त्यांची निवड झाली नाही. 23 जानेवारी रोजी त्यांना फोन कॉल आला आणि तुमची निवड ‘कौन बनेगा करोडपती’ स्पर्धेसाठी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना एक ई-मेलही आला. या सहापानी मेलवर ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाचा लोगो आणि अमिताभ बचन यांची स्कॅन केलेली सही होती. सहाव्या पानावर एक मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. त्यामुळे डॉ.रावळकर यांनी त्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांना निवड निश्चित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या स्पध्रेत पाच कोटी रुपये जिंकलेल्या सुशीलकुमार यानेही संपर्क केल्याचे भासवण्यासाठी सुशीलकुमार यांच्या आवाजात एका जणाने संभाषणही केले. मात्र डॉ. रावळकर यांना संशय आल्याने त्यांनी आर्थिक गु्न्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. आघाव यांनी त्या टोळीच्या मोबाइल आणि दिलेल्या बँक खात्याची चौकशी केली असता हे खाते झारखंडमधील एका खेड्यातील बँकेत असल्याचे पुढे आले, तर मोबाइल क्रमांक दिल्लीतील असल्याचे लक्षात आले. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडण्यात आले असून मोबाइल सिम कार्डही अशाच प्रकारे घेण्यात आले. पूर्वी कार बक्षीस म्हणून लागली, चित्र ओळखा असे ई-मेल यायचे. आता मात्र रिअँलिटी शोच्या नावावर फसवणूक केली जात आहे.

मला 7 जानेवारीपासून ही टोळी फोनवरून संपर्क साधत होती. ‘क ौन बनेगा करोडपती’चा सहावा भाग संपला आहे. पुन्हा ही टोळी शहरातील कुणालाही फसवू शकते. त्यामुळे मी पोलिसांत तक्रार दिली आहे. डॉ. आर. के. रावळकर

फोनवर संपर्क साधून ‘कौन बनेगा करोडपती’ या स्पर्धात्मक मालिकेसाठी निवड झाल्याचे सांगून फसवण्याचा प्रयत्न झाला आहे. या टोळीचे बँक खाते आणि मोबाइल नंबरही बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेला आहे. अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा